Breaking News

आजचा दिवस मान्सूनचाः २०० हून अधिक मिमी मान्सून बरसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये बरसणार

आधीच राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सून पावसाने जूनच्या अखेरीस येऊनही जून महिन्यातील तूट भरून काढल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता जुलै महिना अर्धा संपला तरी अद्याप पावसाने अद्याप मुंबईसर राज्यातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली नसल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांवर दुभार पेरणीचे संकट ओढावले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच अनेक आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावत जोर वाढल्याचं चित्र आहे. अशात हवामान खात्याकडून राज्याला पुढचे ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबई, पालघर, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आजही अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढणार असून गडचिरोली, चंद्रपूर आणि आजूबाजूच्या काही भागांवर मध्यम ते तीव्र ढग पसरले असून पुढच्या २ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशात पुढील २ दिवस मध्य भारताच्या काही भागांत जोरदार ते अती जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणचा काही भाग, सातारा, पुणे नाशिकचा घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस होईल. मराठवाड्यातील काही भागांत तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पालघर, पुणे, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर इतर महाराष्ट्रामध्ये रिमझिम पावसाच्या सरी बरसतील अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

Check Also

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “चला जाणूया नदीला” दुसऱ्या टप्प्यातील अभियान लवकरच

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २ ऑक्टोबरला प्रारंभ झालेल्या “चला जाणूया नदीला ” अभियानांतर्गत नदी संवाद यात्रा आता राज्यभर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *