Breaking News

किरीट सोमय्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी केली सखोल चौकशीची घोषणा अंबादास दानवे, अनिल परब यांच्या मागणीनुसार सखोल चौकशी करण्याचे दिले आश्वासन

ईडी सारख्या तपास यंत्रणांचा धाक दाखवित आणि भाजपा पक्ष संघटनेत आणि विधान परिषद, राज्यसभा आदी ठिकाणी पद देण्याचे आमिष दाखवित भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महिलांचे लैगिंक शोषण करत असल्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या व्हिडीओवरून विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ( ठाकरे ) गट आमदार अनिल परब यांनी याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी घोषणा करण्यात येणार असल्याचे आश्वासन विधान परिषदेत दिले.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटले. आज विधान परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली. त्यानंतर अनिल परब यांनीही सखोल चौकशीची मागणी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारणात अनेकवेळा असे प्रसंग येतात की त्यात माणसाचं पूर्ण राजकीय आयुष्य आणि केलेली पुण्याई पणाला लागते. पण, समोर आलेल्या प्रकरणातील काही तक्रारी असतील, तर त्याची चौकशी आम्ही करू. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही.

महिलेची ओळख सांगता येत नाही. तपासासाठी पोलिसांना महिलेची ओळख दिली जाईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून महिलेची ओळख पटवतील. महिलेची ओळख आपण जाहीर करत नाही. त्यामुळे ती जाहीर करण्याचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

दरम्यान, सोमय्यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. याची अतिशय सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या म्हणाले, देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी विनंती किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *