Breaking News

“आमिष दाखवित…मराठी बायकांना”, किरीट सोमय्यांचे ते आक्षेपार्ह व्हिडिओज् अंबादास दानवे यांनी दिले सभागृहात पेनड्राईव्ह देत केली सखोल चौकशीची मागणी

मागील काही वर्षापासून ईडी, सीबीआयच्य़ा कारवाईचा धाक दाखवित तर कधी विधान परिषदेच्या एखाद्या समितीवर, महामंडळावर वर्णी लावतो किंवा राज्यसभेवर एखादे पद देतो, पक्ष संघटनेत पद देतो सारखी आमिषे दाखवित अनेक महिलांचे लैगिंग शोषण केल्याचा धक्कादायक आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर केला.

तसेच यावेळी अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडिओजचा एक पेनड्राईव्ह विधान परिषदेच्या उपसभापती अॅड नीलम गोऱ्हे यांना देत याप्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही केली.

यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, जो राजकीय पक्ष नैतिकतेचे धडे देतो, त्याच पक्षाच्या माजी खासदाराचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झालेत. काही माता भगिणींनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्याने ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून तसेच स्वत:च्या पक्षातल्या महिलांना पद देतो, जबाबदारी देतो, महामंडळं देतो, असं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार केलेत. माझ्याकडे काही व्हिडीओज आले आहेत. हा व्यक्ती महाराष्ट्र द्रोही आहे. असे जे राजकीय दलाल-उपरे महाराष्ट्रात आलेले आहेत आणि मराठी भगिनींचा छळ करतायेत त्या किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओची चौकशी झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका मांडली.

दुसरीकडे सरकारी पक्षाच्या बाजूने निवेदन करताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा शब्द विरोधकांना दिला.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओच्या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेच्या सभागृहात उमटले. नियम २८९ च्या अंतर्गत या प्रकरणावर विरोधकांनी चर्चेचा आग्रह धरला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्यावर प्रचंड हल्लाबोल करत त्यांच्या चौकशीची मागणी केली.

अंबादास दानवे बोलत असताना सभागृहातील विरोधी पक्षाचे आमदार ब्लॅकमेलर, लाव रे तो व्हिडीओ अशी शेरेबाजी करत होते. तेवढ्यात ‘प्लीज तो व्हिडीओ लावू नका’, असं उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या. ते व्हिडीओ बघणं माझ्यासाठी कठीण काम असेल. पण महिला पोलिस आणि डॉक्टरांना मी व्हिडीओ बघायला सांगेन आणि त्यांची मतं मी त्यांना विचारेन, असं गोऱ्हे म्हणाल्या.

अंबादास दानवे यांनी भाजपाला सवाल करत म्हणाले, ज्याच्यावर सेक्स व्हिडीओचा आरोप आहे, त्याला भारतीय जनता पक्ष संरक्षण देणार का? पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भाजपाने याचं उत्तर द्यावं, असा आग्रह देखील दानवे यांनी धरला. पीडित माता भगिणीचा टाहो राज्य सरकार ऐकणार आहे का? असा सवालही दानवे यांनी विचारला.

अंबादास दानवे म्हणाले, काही लोक ईडीची भीती दाखवतात, सीबीआयची भीती दाखवतात, याच्या माध्यमातून काही लोकांना ब्लॅकमेल करतात. तीच व्यक्ती त्यांच्याच पक्षातल्या महिलांना पद देतो, जबाबदारी देतो, महामंडळं देतो, असं आमिष दाखवून महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत प्रश्न निर्माण करते. जो राजकीय पक्ष नैतिकतेचे धडे देतो, त्याच पक्षाच्या माजी खासदाराचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झालेत. काही माता भगिणींनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. गुन्हा करणारी व्यक्ती महत्वाची नसून ही अपप्रवृती महत्वाची आहे. माझ्याकडे काही व्हिडीओज आले आहेत. केंद्राची सुरक्षा घेऊन फिरतो, त्याच सुरक्षेच्या बळावर जर तो व्यक्ती असा अन्याय अत्याचार करत असेल तर त्याची सुरक्षा तत्काळ काढून घ्या, अशी मागणीही केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *