Breaking News

Tag Archives: wine sale permission

अण्णा हजारेंनी आपला निर्णय बदलला, उपोषण स्थगित: वाचा त्यांच्याच भाषेत सरकारने वाईन विक्रीच्या धोरणाबद्दल जनतेला विचारून निर्णय घेण्याचे मान्य केले

मराठी ई-बातम्या टीम राळेगणसिद्धी परिवाराने ४५ वर्षापूर्वी गावातील दारुभट्ट्या बंद केल्या. तसेच संपूर्ण गाव दारुमुक्त करून व्यसनाधीनतेच्या विरोधात जनजागृती सुरू केली होती. त्यानंतर १९९५ पासून भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचा दारू आणि व्यसनाधीनतेला नेहमीच कडाडून विरोध राहिलेला आहे. या विषयावर अनेक आंदोलनेही झालेली आहेत. त्या आंदोलनातून महिलांच्या ग्रामसभेद्वारे दारुबंदीचा कायदा, ग्रामरक्षक …

Read More »

उध्दव ठाकरे सरळमार्गी पण,”पण ढवळ्या शेजारी पवळा बांधला अन…” बंडतात्या कराडकर यांची अजित पवारांवर टीकास्त्र

मराठी ई-बातम्या टीम कोणत्या राजकीय नेत्यांची मुलं दारू पीत नाही ते सांगा असा प्रतिप्रश्न करत नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचा दावा करत पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? तसेच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांचे काय असा उल्लेख करत कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा …

Read More »

पवारसाहेब आम्ही पीत नाही, तुम्हीच वाईन – दारू मधला फरक समजून सांगा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला

मराठी ई-बातम्या टीम आपण पीत नसल्याने आपल्याला वाईन आणि दारूमधील फरक समजत नाही. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीच तो समजून द्यावा. किराणा दुकानांमध्ये वाईन उपलब्ध करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यामुळे पवारांना दुःख झाले असले तरी या निर्णयाच्या विरोधात गावोगाव महिला रस्त्यावर उतरल्यानंतर पवारांना खरे दुःख होईल, असा उपरोधिक टोला …

Read More »

वाईन विक्री निर्णयासंदर्भात शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट राज्य सरकारने वेगळा दृष्टीकोन स्विकारला तर फारसं वावगं होणार नाही

मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी १०० मीटर क्षेत्रफळाच्या सुपर मार्केट आणि वॉक इन स्टोअरमध्ये वाईन विक्रीस परवानगी दिल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. त्यावर सत्ताधारी महाविकास आघाडीकडून वाईन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या वाईन विक्री …

Read More »

फडणवीसांच्या आरोपामुळे जनाब राऊत बावचळले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील सुपर मार्केट आणि १००० चौरस फुट क्षेत्रफळाच्या दुकानातून वाईन विक्रीस परवानगी राज्य सरकारने दिल्यानंतर भाजपाच्या नेत्यांकडून टीकेचा सिलसिला अद्यापही सुरु असतानाच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मात्र फडणवीसांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने थेट शिवसेना प्रवक्ते तथा नेते संजय राऊत यांच्यावर बा‌वचळल्याची खोचक टीका करत त्यामुळेच त्यांच झिंग …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय: आता या दुकानातून वाईन मिळणार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली माहिती

मराठी ई-बातम्या टीम मागील काही महिन्यापासून राज्यातील जनरल स्टोअर, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याबाबतचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत होता. त्यानुसार आज अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेत राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन …

Read More »