Breaking News

Tag Archives: mva alliance

एकनाथ शिंदे बंडाळी; ठाकरे सरकारने घेतला यु टर्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले माझा संपर्क सुरु आहे

राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेतील दोन नंबरचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडाळी केली. या बंडाळीचा आज दुसरा दिवस असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार आणि विधानसभा …

Read More »

एकनाथ शिंदे ‘या’ २० आमदारांना घेवून सूरतमध्ये, शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र शिंदेमुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी अडचणीत

शिवसेनेतील नंबर २ चे नेते म्हणून ओळखले जाणारे आणि ठाण्याचे सर्वेसर्वा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या जवळपास २० आमदार घेवून गुजरातमधील सूरत गाठल्याची माहिती पुढे आल्याने महाविकास आघाडी सरकारबरोबर शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अडचणीत आणल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. काल दिवसभर विधान परिषदेसाठी मतदान …

Read More »

पुरेसे संख्याबळ मविआकडे पण, बाजी मारली भाजपाने; शिवसेनेच्या ‘संजय’चा पराभव निकाल पहाटेला जाहिर, मविआ आणि भाजपाला तीन तीन जागी विजय

राज्यसभा निवडणूकीतील मतदान करण्याच्या पध्दतीवरून भाजपा आणि महाविकास आघाडीने एकमेकांवर आक्षेप घेत त्याप्रश्नी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. त्यानुसार शिवसेनेचे सुहास कांदे यांचे बाद ठरवित बाकीच्या आक्षेपांमध्ये तथ्य नसल्याचे मत सांगत आयोगाने निकाल दिला. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही त्यांच्या संख्याबळाने दगा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या चवथ्या …

Read More »

आपल्याच आमदारांवर अविश्वास का? म्हणणाऱ्या भाजपाकडूनही ‘ताज’वर व्यवस्था महाविकास आघाडीवर टीकास्त्र आशिष शेलार यांनी केले होते

राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी शिवसेनेकडून ४ था उमेदवार तर भाजपाकडून ३ रा उमेदवार जाहिर केल्यानंतर या निवडणूकीतील चुरस निर्माण झाली. खबरदारीचा उपाय म्हणून महाविकास आघाडीकडून त्यांच्या समर्थक आमदारांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाजपाचे आमदार आशिश शेलार यांनी टीका केली. मात्र आता भाजपाकडूनही खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व …

Read More »

राज्यसभा निवडणूकीवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मोठे वक्तव्य आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल

महाविकास आघाडी अडचणीत वगैरे काही नाही. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यामुळे आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. आज शरद पवार यांच्याशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. अपक्षांशी विविधस्तरावर चर्चा …

Read More »

ओवेसींच्या प्रस्तावावर नाना पटोले यांचे प्रत्युत्तर, तेच लोक निमंत्रण देतील राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पटोलेंचा खोचक टोला

राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने एमआयएमचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी महाविकास आघाडीने मागितली तर मदत देऊ अशी तयारी दाखविली. त्यामुळे आता ओवेसी यांच्या या प्रस्तावावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक टोला लगावत म्हणाले की, एमआयएम पक्षाची ज्यांच्यासोबत युती असेल तो पक्ष तो पक्ष एमआयएमशी बोलेल असे स्पष्ट केले. राज्यसभा …

Read More »

राजू शेट्टी बाहेर पडल्यानंतर जयंत पाटील पहिल्यांदाच म्हणाले, कारणच नव्हतं महाविकास आघाडी सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य

राज्यातील महाविकास आघाडीमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे बाहेर पडल्यानंतर त्यांच्या बाहेर पडण्याबाबत महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्यांनी याबाबत ब्र शब्दही काढला नाही. मात्र आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, एखादी गोष्टी मला किंवा कोणत्याही मंत्र्यांना सागितली व त्यांच्या कामांना नकार दिला असे …

Read More »