Breaking News

Tag Archives: mns

राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश

काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज राज्यातील विविध भागातील राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसे या पक्षातून शेकडो कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या उपस्थितीत काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

टोलबाबत झालेल्या चर्चेची मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिली “ही” माहिती राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी शिंदे सरकारचे मंत्री आणि प्रशासकिय अधिकारी पोहोचले

मुंबई एंट्री पॉईंटवरची टोलवाढ आणि एकूणच टोलबद्दलच्या लोकांच्या मनात असलेल्या तक्रारी, राग आहे याला वाचा फोडण्यासाठी काल मुख्यमंत्री महोदयांच्या सोबतच दादा भुसे ह्यांच्यासोबत बैठक झाली. ९ वर्षांपूर्वी ह्याच विषयावर आम्ही तात्कालीन मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो; तेंव्हाच लक्षात आलं होतं की सरकारने टोल कंपन्यांशी केलेले करार होते जे २०२६ पर्यंत आहेत. ह्यातले …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, टोलनाक्यांवर सरकारच्या कॅमेऱ्यासोबत मनसेचे कॅमेरे कशासाठी? सरकारने निर्णय कॅबिनेटमध्ये घ्यायचे असतात कोणाच्या घरी नाही

राज्यातील टोल प्रश्नावर मनसेने आंदोलन करताच सरकार राज ठाकरेंच्या घरी जाते हे घटनाबाह्य आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राज ठाकरे यांच्या घरी सरकार जाते म्हणजे हे समांतर सरकार चालवल्यासारखे आहे. विरोधी पक्षाने जनतेचा एखादा मुद्दा सरकारकडे मांडला तर त्यावर सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचा असतो कोणाच्या घरी मंत्री …

Read More »

राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केले “हे” प्रसिध्दी पत्रक व्हीडिओ चित्रीकरण, पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नयेत यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहासह रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबई एन्ट्री पॉईंटच्या टोल नाक्यांवर व्हीडिओ चित्रीकरण करण्यात यावे, पथकर मार्गावरील पुलांचे, उड्डाणपुलांचे, भुयारी रस्त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण …

Read More »

राज ठाकरे यांचा अंतिम इशारा, … अन्यथा टोल नाके जाळून टाकू टोलचा पैसा जातो कोणाच्या खिशात

राज्यातील टोलच्या विरोधातील आंदोलनप्रश्नी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पुकारलेले उपोषणाचे हत्यार मागे घेत दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील टोल बंद करा अन्यथा आगामी काळात टोल नाके जाळून टाकू असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील पत्रकार परिषदेत दिला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात केवळ कमर्शियल गाड्यांनाच टोल आकारणी होत …

Read More »

शरद पवारांविषयी आम्ही डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही आनंद परांजपेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला

शरद पवारांबरोबर आमच्या पण भावना आहेत,मात्र आम्ही डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांनी जेव्हा राजीनामा दिला त्यावेळी आम्हालादेखील अश्रू अनावर झाले होते याची आठवण करून देतानाच सारखे – …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, आम्हाला निषेध नोंदवणं माहीत नाही…. मराठी महिला स्त्रीला जागा नाकारल्याच्या घटनेचेनंतरचे पडसाद

गणेश अंनत चतुर्दशी दिवशी अख्खा महाराष्ट्र त्याच्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याच्या कामात व्यस्त असताना मुलुंडमध्ये विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवसदन इमारतीत मराठी महिलेला केवळ महाराष्ट्रीयन आहे म्हणून जागा देण्यास नकार देण्याचा प्रकार घडला. त्याचे राजकिय पडसाद चांगलेच उमटले. दरम्यान राज ठाकरे यांनी ट्विट करत …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात मुख्यमंत्री शिंदेंनी तोडगा काढला ते … पूर्ण न होणारी आश्वासन दिली नसतील अशी आशा

मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो असे …

Read More »

राज ठाकरे म्हणाले,… सरकारचं चुकलं मराठा आरक्षण आंदोलकांवरील लाठीचार्ज आंदोलन

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक्सवर ट्विट करत आपली भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणाले, ह्या घटनेवर मी …

Read More »

नाना पटोले यांची माहिती ‘इंडिया’च्या पाहुण्यांसाठी हे खास खाद्यपदार्थ यात… देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम; एकनाथ शिंदे फक्त चेहरा

राज्यातील तिघाडी सरकारमध्ये अंतर्विरोध आहे हे स्पष्ट झाले आहे. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्यात अधिकारपदावरून स्पर्धा सुरु आहे. अजित पवार यांच्या दादागिरीचा अनुभव मविआ सरकारने पाहिला आहे पण सध्या त्यांच्या दादागिरीला चाप लावला आहे. राज्यातील सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ चेहरा आहेत आणि खरे मुख्यमंत्री ‘सुपर सीएम’ हे …

Read More »