Breaking News

Tag Archives: mns

राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती, युनोस्कोच्या त्या नियमानुसार बारसूत प्रकल्प होऊच शकत नाही जमिनी व्यापारी लोकप्रतिनिधींना अमराठी लोकांना विकू नका

कोकणातील बारसू येथील प्रस्तावित रिफानरीच्या प्रकल्पावरून आज ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांची भेट घेतली. त्यापाठोपाठ या रिफायनरी प्रकल्पावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही कोकणचा दौरा करत रत्नागिरी येथील स्व.प्रमोद महाजन क्रिडा संकुलाच्या मैदानावर जाहिर सभा घेतली. यावेळी राज ठाकरे यांनीही उध्दव ठाकरे यांच्या …

Read More »

राज ठाकरेंच्या त्या सल्ल्यावर अजित पवार यांचे प्रत्युत्तर, काकाकडे जसं लक्ष… शरद पवारांच्या त्या वक्तव्याचा अर्थ नव्या चेहऱ्यांना संधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची नुकतीच मुलाखत घेतली. यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांना काय सल्ला द्याल असा सवाल केला. यावर राज ठाकरेंनी अजित पवारांना …

Read More »

विनायक राऊत म्हणाले, पिकनिकमुळे अनेकवेळा आले आणि… फारशी दखल घ्यावी असं वाटत नाही

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ६ मे रोजी कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते रत्नागिरीत जाहीर सभा घेणार असल्याची माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. कोकणातील विविध समस्यांवर ही सभा होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणात संघटन वाढवण्याकरिता मनसेकडून हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर …

Read More »

बाबरी विध्वंसाआडून चंद्रकांत पाटील यांचा नेमका कोणावर निशाणा, ‘शिंदे, फडणवीस कि ठाकरे ?’ देवेंद्र फडणवीसांची १८ दिवसांची जेलवारी आणि चंद्रकांत पाटील यांना अटक नाही

शिवसेनेतील फूटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार गेले. त्यानंतर राज्यात भाजपासोबतच्या सरकारची धुराही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. या सगळ्या परिस्थितीत जनमत आज स्थितीला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या बाजूने असल्याचे दिसून येत नाही. या सरकारबद्दल अद्यापही जनतेच्या मनात चांगली भावना नसल्याचे वेळोवेळी दिसून …

Read More »

मनसेप्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे यांच्यात एकतास चर्चा, बैठकीनंतर निवडणूकीसाठी… खटले मागे घेण्याबाबतचा निर्णय तपासून घेण्यात येईल -मुख्यमंत्री

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची मालेगावात आज सभा झाली. उद्धव ठाकरे यांनी या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांची मालेगावात अनेक वर्षांनी ही सभा झाली. त्यामुळे संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागलेलं होतं. या दरम्यान मुंबईत अचानक राजकीय घडामोडींना वेग आला. महाराष्ट्राचे …

Read More »

उध्दव ठाकरेंचा राजला टोला, जशी स्क्रिप्ट तशे वाचन… मी तर त्या बाबत पूर्वीच एका चित्रपटाचा संदर्भ देत स्पष्ट केले होते...

गुढी पाडव्या निमित्त आयोजित मनसैनिकांच्या मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी १८ वर्षापूर्वीचा किस्सा सांगताना शिवसेना सोडण्यामागे उध्दव ठाकरे हेच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत नारायण राणे यांच्याबाबतही तेच कारणीभूत असल्याचा आरोप केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा या मुद्यावरून चर्चेला सुरुवात झाली. अर्थसंकल्पिय अधिवेशनात मराठी भाषा भवन इमारतीच्या अनुषंगाने उध्दव ठाकरे …

Read More »

राज ठाकरेंचे पत्राद्वारे आवाहन, जो उमदेपणा भाजपाने दाखविला तोच महाविकास आघाडीने दाखवावा बिनविरोध पोटनिवडणूकीसाठी राज ठाकरेंचे विरोधकांना आवाहन, पण..

पिंपरी चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (५ फेब्रुवारी) सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहून आवाहन केलं आहे. मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असं आवाहन राज ठाकरेंनी पत्राद्वारे केले. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेच्या …

Read More »

बाळा नांदगांवकरांच्या ट्विटवर सचिन सावंतांचा खोचक सवाल, अयोध्या दि ट्रॅप चा रचेता कोण? भाजपा खासदार बृजभूषण सरण सिंगवरील मनसेच्या भूमिकेवर केला सवाल

काही महिन्यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. मात्र बृजभूषण सिंग हे पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला हजर राहिले. यावेळी खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्याला विरोध न केल्याबद्दल आभारही मानले. यानंतर मनसे …

Read More »

राज ठाकरेंना भेटणार का? प्रश्नावर बृजभूषण सिंग म्हणाले, मंचपर आऐंगे तो… मै कुस्ती के लिए आया हुँ

सध्या बहुचर्चित कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी कोण होणार याबाबतची उत्सुकता निर्माण झालेली असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंग हे कुस्ती स्पर्धेसाठी पुण्यात आले. यावेळी त्यांना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून केलेल्या विरोधाबाबत प्रश्न विचारला असता बृजभूषण सिंग म्हणाले, मी सध्या …

Read More »

राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यावरून विनायक राऊत म्हणाले, सुपारी घेऊन बोलायचा धंदा प्रकल्प गुजरातला नेल्याचे राज ठाकरेंकडून समर्थन

मागील काही दिवसांमध्ये राज्यात येणारे अनेक उद्योग गुजरातसह अन्य राज्यांत गेले. महाराष्ट्रात होणारी कोट्यवधींची गुंतवणूक परराज्यात गेली. याच मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होत होते. हा वाद मागे पडलेला असतानाच राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्यास काहीही नुकसान होणार नाही, असे विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे …

Read More »