Breaking News

राज ठाकरे यांचा अंतिम इशारा, … अन्यथा टोल नाके जाळून टाकू टोलचा पैसा जातो कोणाच्या खिशात

राज्यातील टोलच्या विरोधातील आंदोलनप्रश्नी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पुकारलेले उपोषणाचे हत्यार मागे घेत दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील टोल बंद करा अन्यथा आगामी काळात टोल नाके जाळून टाकू असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील पत्रकार परिषदेत दिला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात केवळ कमर्शियल गाड्यांनाच टोल आकारणी होत असल्याच्या केलेल्या व्यक्तव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका करीत हे धादांत खोटं असल्याचे सांगत टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम असून ,यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले दरम्यान ठाकरे यांची पत्रकार परिषद होत असतानाच मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात टोलनाक्यांवर जावून जोरदार आंदोलन केले

राज ठाकरे म्हणाले, मनसेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टोल नाके बंद करण्यासंदर्भात मागील चार दिवसांपासून उपोषण आंदोलनाला बसल्यानंतर तसेच काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टोल नाक्या बाबत वक्तव्य आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारला राज्यातील टोलनाके जाळून टाकण्याचा थेट इशाराही यावेळी दिला.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, मला राज्य सराकरकडून एक पत्र आलंय. त्यात सगळ्या गोष्टी नमूद केल्या होत्या. कुणाकुणाला टोल नाहीये, कुणाला टोल आहे असं त्यात लिहिलं होतं. टोलचा सगळा पैसा कॅशमध्ये आहे. हा पैसा जातो कुठे? याचं होतं काय? त्याच त्याच कंपन्यांना हे टोल मिळतात कसे? त्यानंतरही रस्त्यांवर खड्डे पडणार असतील तर हा पैसा जातो कुठे? आपण रोड टॅक्स भरतो, तो कुठे जातो? हे कुणालाही कळत नाही. अत्यंत घाणेरड्या परिस्थितीतले रस्ते आपल्या वाट्याला येतात, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

यावेळी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलमुक्त महाराष्ट्रसंदर्भात केलेल्या जुन्या विधानांच्या व्हिडीओ क्लिप्स पत्रकारांना ऐकवल्या. सेना-भाजपा युती आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी होती. आत्ता काय आहे, त्याचं काय मातेरं झालंय हे कुणालाच माहिती नाही. तेव्हा हे पक्ष काय म्हणाले ते मी एकेक मिनिटाच्या क्लिपवरून दाखवतो, असे सांगत त्यांनी व्हिडीओ क्लिप्स ऐकवल्या. त्यांच्याकडे दर आठवड्याला, दर दिवसाला टोलचे पैसे जात असतात. हे सगळे एवढ्या थापा मारतात. त्यानंतर त्याच त्याच पक्षाला मतदान कसं होतं, हेच माझ्यासाठी अनाकलनीय आहे, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

फडणवीस यांनी केलेल्या दावा धादांत खोटा आहे जर टोलमुक्ती झाल्यानंतरही आपण टोल देत असू, तर हे पैसे जातायत कुठे? टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यांचं काय उत्तर येतंय बघू. नाहीतर आत्ता उपमुख्यमंत्र्यांनी सांगिलंय की चारचाकी, दुचाकींना टोल नाही. मग आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभं राहून चारचाकींना टोल भरू देणार नाही. याला जर त्यांनी विरोध केला, तर आम्ही हे सगळे टोलनाके जाळून टाकू. पुढे महाराष्ट्र सरकारला काय करायचंय ते सरकारनं कराव असा गंभीर इशारा ठाकरे यांनी दिला.

ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले मुद्दे खालीलप्रमाणे….

मुंबई प्रवेशाच्या पाचही टोलनाक्यावर केलेल्या टोलवाढीविरोधात माझे सहकारी श्री. अविनाश जाधव ह्यांनी व माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी उपोषण केलं… आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर मी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली… त्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

▪️ मुंबई प्रवेशाच्या पाचही नाक्यावरच्या टोलवाढी विरोधात माझा सहकारी श्री. अविनाश जाधव व माझे महाराष्ट्र सैनिक उपोषणाला बसले आहेत कळल्यावर मी अविनाशला कळवलं “उपोषण वगैरे करणं आपलं काम नाही… मी येतो उद्या ठाण्याला भेटायला.”

▪️ गेली अनेक वर्ष टोलधाडीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक आंदोलनं केली. महाराष्ट्रामध्ये ६५ टोल नाके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे बंद झाले. त्यानंतरच्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू… काय झालं त्या आश्वासनांचं ? त्यांना कुणीही जाब विचारत नाहीये… ना माध्यमं, ना जाणकार, ना जनता.

▪️ सरकारी भाषा इतकी क्लिष्ट, घाणेरडी असते जेव्हा माझ्यावर केसेस होत्या तेव्हा मला कळायचंच नाही की मला धरलं आहे की सोडलं आहे.

▪️ एका प्रशासकीय अधिकाऱ्याकडून काल मी माहिती घेतली तर त्यांनी एक माहिती पत्रक पाठवलं त्यात म्हटलंय दुचाकी, रिक्षा, ट्रॉली ट्रॅक्टर यांना टोल नाही. त्यानंतर एकीकडे असं म्हणतात १०-१२ प्रवासी असणाऱ्या चारचाकी सुमो ह्यांच्यासाठी अमुक-अमुक पथकर मग ४-५ सीटर कारसाठी वेगळं काय? म्हणजे काहीच सुस्पष्टता नाही. पुढे कळस म्हणजे जो पेडर रोडचा उड्डाणपुलाचाही टोलसाठी उल्लेख आहे, जो पूल अजून बांधलाच नाहीये.

▪️मुंबई प्रवेशाचे पाचही टोलनाके म्हैसकर ह्यांच्याकडे आहेत… हे म्हैसकर कोणाचे लाडके आहेत?

▪️ मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनीही टोल बंद करण्यासाठी एक याचिका दाखल केली होती… मला त्यांना विचारायचं आहे की ती याचिका कुणाच्या सांगण्यावरून मागे घेतलीत तुम्ही?

▪️ मला आपल्या जनतेचंही आश्चर्य वाटतं… जे लोक खोटी आश्वासनं देतात, सत्तेत येऊन पुन्हा तुम्हालाच पिळतात त्यांनाच मतदान कसं करता? जर लोकांना टोल भरून आनंद मिळत असेल तर मग घ्या. खोटी आश्वासनं देणाऱ्या नेत्यांच्या विरोधात मतदान झालं तरच त्यांना त्यांची चूक समजेल.

▪️ मी अविनाशला सांगितलंय की, अशा नादान राजकारण्यांसाठी जीव गमावू नको… एक माणूस दगावला तरी ह्यांना काहीच फरक पडणार नाही. आता मी अविनाशला उपोषण मागे घ्यायला सांगितलं आहे.

▪️ येत्या २-४ दिवसांमध्ये मी मुख्यमंत्र्याची भेट घेईन. त्यांच्यासमोर सविस्तर विषय मांडेन. त्यानंतर वाढीव टोलबाबतीत काय भूमिका घ्यायची ती घेऊच.

▪️ मुंबईत, ठाण्यात दरवर्षी फुटपाथ खोदून पेवर ब्लॉक लावले जातात. हे का केलं जातं? एकदा अधिकाऱ्यांनाही जाब विचारलं गेला पाहिजे.

▪️ मुंबई-नाशिक असो व अन्य रस्ते असोत, दरवर्षी खड्डे पडतातच कसे? हे एक रॅकेट आहे… एकदाच २०-२५ वर्षांसाठी रस्ता बनवला तर दरवर्षी काम निघणार नाही … काम नाही तर टेंडर नाही आणि टेंडर नसेल तर कमिशन कसं खायचं ?

▪️ निवडणुकांच्या वेळी जनता जेव्हा मतदान करायला जाते तेव्हा त्यांच्या डोक्यात ना वाढलेला टोल असतो, ना वाढलेली शाळेची फी असते, ना इतर भेडसावणाऱ्या समस्या असतात तेव्हा भलत्याच मुद्द्यांवर मतदान करतात आणि नंतर ५ वर्ष पश्चातापाचा हात कपाळावर मारावा लागतो.

▪️ मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडतात. का? हे एक रॅकेट आहे… चांगले रस्ते केले तर २०-२५ वर्षासाठी ते चांगले टिकतात मग कामं निघत नाहीत कामं निघाली नाहीत तर टेंडर निघत नाहीत टेंडर निघाले नाहीत तर कमिशन निघत नाही, असं भ्रष्टचक्र आहे.

▪️ मुंबई-ठाण्यात चांगला असलेला फुटपाथ खोदतात तिथे पेव्हर ब्लॉक लावतात, मग पेव्हर ब्लॉक पुन्हा खराब होतात मग पुन्हा टेंडर… हे असंच सुरु असतं. कधीतरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही तुम्ही जाब विचारला पाहिजे.

▪️ निवडणुकीच्या वेळी जेव्हा तुम्ही मतदानाला जात तेव्हा ना तुमच्या डोक्यात टोल असतो ना शाळेची फी असते ना राष्ट्रावरील खड्डे तुम्हाला दिसत असतात तुम्ही वेगळ्याच विषयांवर मतदान करता आणि नंतर ५ वर्ष डोक्यावर हाथ लावून बसता या सर्व गोष्टींचा जनतेने विचार करावा.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, जयंत पाटील कोणाच्या संपर्कात माहित नाही

पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *