Breaking News

आदित्य ठाकरे यांचा भाजपावर निशाणा, आमदार विकत घ्यायला पैसै, मात्र रूग्णालयासाठी पैसे नाहीत नांदेड येथील रूग्णालयातील मृत्यूवरून सरकारला करून दिली आठवण

राज्यातील दोन तीन जिल्ह्यात मृत्यू संख्या वाढल्याचे दिसत होत त्याला काही कारण असू शकतात पण यात राजकारण न करता मार्ग काढावे लागतील. हेच डीन, डॉक्टर, नर्स असताना कोरोना काळात जगाने आपल कौतुक केले. हे उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. काय कमी राहत आहे याची कारणं शोधावे लागेल असे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी सांगत औषध पुरवठा नियमित होत नाही. आधी हाफकिन कडून ही औषध खरेदी केली जात होती. आता कुठल्या तरी प्राधिकरण करत आहे. तर आता डीन आपल्या स्तरावर उपाय योजना करतात असे सांगितले.

आदित्य ठाकरे म्हणाले, रुग्णालयात मोठ्या संख्येने पद रिक्त आहे. २९ जुलै रोजी मी हा मुद्दा मांडला होतं BMC मध्ये देखील स्टाफ आणि औषधांची कमतरता आहे. पावसाळ्यात रुग्ण संख्या वाढतात. सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवून रुग्ण उपचारासाठी येतात. पण रूग्णांना पुरेशा प्रमाणात उपचार मिळत नाहीत असा आरोप केला.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, रूग्णालयांमध्ये वैद्यकीय शिक्षण विभाग सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत आहे. आम्ही या मुद्द्यावर आंदोलन करू शकलो असतो. राजकीय पक्षाने यावर ठरवलं पाहिजे असे सांगत नांदेडमधील मृत्यूची न्यायालयाने सुमोटो दखल घेतल्यावर आता सरकार जग झाला आहे. लोकांचा विश्वास उडू नये या करिता राजकीय पक्षांनी विचार करायला पाहीजे असे मतही यावेळी व्यक्त केले.

मी मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन आंदोलन आणि राजकारण करू शकतो नागपुरात पूरस्थिती येऊन देखील ते इथे आले नाहीत असा आरोप आदित्य ठाकरे यांनी करत मी कोणाचे नाव न घेता राजकारण न करता बोलत आहे असा टोलाही लगावला.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, या प्रकरणात डीन किंवा डॉक्टर वर चौकशी होईल. पण औषध पुरवठा होत नाही हाफकिन औषश देत नाही. सरकारने पाठबळ दिले पाहिजे. लोकांचा आता विश्वास उडायला लागला आहे. कारण दाखवायची असेल तर १०० कारण दाखवता येईल. औषध प्राधिरणाला ७०० कोटी रुपये देऊन औषध पुरवठा झाला नाही असा आरोपही केला.

आमच्या काळात कोविड होता आम्ही व्यवस्थित आढळले. पालकमंत्री पदासाठी भांडून झाले असेल तर ज्या मागण्या आहेत, कचरा, गटार सफाई, पोलीस बंदोबस्त सारख्या छोट्या गोष्टी कडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे असा टोलाही शिंदे सरकारमधील मंत्र्यांना आदित्य ठाकरे यांनी लगावला.

आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही BMC हाताळताना एप्रिल पासून बैठका घेऊन आढावा घेतो. त्यामुळे मंत्री पर्यंत जाण्याचा विषय येत नाही. डीन ला जास्त अधिकार द्यायला पाहिजे अशी मागणी करत स्वच्छता करणे चुकीचे नाही, पण खासदारांनी स्टंट करून डीन ला हे करायला लावणं हे योग्य नाही. राजकारण २४ तास करता येईल, आमदार विकत घ्यायला पैसे आहेत पण रुग्णालयासाठी नाही अशी टीका केली.
पाच राज्याच्या निवडणुका लागल्या पण राज्यातील दोन जागांसाठी निवडणूक लागत नाही तिथले मुद्दे कोण मांडणार असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी केला.

Check Also

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना ४८ तास प्रचार करण्यास बंदी

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) प्रमुख के चंद्रशेखर राव यांना लोकसभा निवडणुकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *