Breaking News

Tag Archives: congress

आयकर विभागाने काँग्रेसला पाठविलेल्या नोटीसीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मागील महिनाभरात काँग्रेस पक्षाला आयकर विभागाने पाठविलेल्या दोन नोटीसींमधून २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षातील आयकर उत्पन्नातील तफावतीवरून एकूण ३ हजार ५६७ कोटी रूपयांचा दंड ठोठावला. त्यासंदर्भातील काँग्रेसला नोटीसही पाठविली. त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी सॉलिसीटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, सध्याच्या निवडणूकीचा काळ असल्याने …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आचारसंहितेचा भंग

लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना भाजपा नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांची गृहमंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली. राज्याच्या मुख्य …

Read More »

महारॅलीत इंडिया अलायन्सचा नारा, भाजपाचा पराभव

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडीने केलेली अटक आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा “दुरुपयोग” यासह अनेक मुद्द्यांवर “सुरक्षा” करण्यासाठी ३१ मार्च रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘महारॅली’ आयोजित करण्यात आली होती. या महारॅलीसाठी इंडिया आघाडीतील सहभागी घटक पक्ष असलेले काँग्रेसचे नेते सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे, …

Read More »

आयकर विभागाची काँग्रेसला ३, ५६७ कोटींची आणखी एक नोटीस

लोकसभा निवडणूकीसाठी आचारसंहिता लागू होऊन पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही विविध पक्षांनी सुरु झाली. एकाबाजूला भाजपाने विरोधी पक्षातील महत्वपूर्व नेत्यांना पक्षात आणण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरण्यास सुरु केले आहे. तर दुसऱ्याबाजूला देशाच्या राजकारणात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला ऐन निवडणूकीच्या काळात अडचणीत आणताना, पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, आयकर विभागाकडून त्यांना …

Read More »

नाना पटोले यांचा पलटवार, फडणवीसांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पहावा, थिएटर…

महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण असून पहिल्या टप्यातील विदर्भातील पाचही जागांवर काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील. मोदी सरकारची जुमलेबाजी व फेकुगिरी आता चालणार नाही, लोकसभा निवडणुकीत जनता भारतीय जनता पक्षाच्या तानाशाही सरकारला सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीतच समझोता नाही

महाविकास आघाडीचा त्यांच्यामध्येच समझोता नाही असे आम्ही सांगत होतो, ते आता स्पष्ट झाले आहे. एकत्रित यादी जाहीर होत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर पडत आहेत. त्यांचे मतभेद कायम आहेत आणि म्हणून मैत्रीपूर्ण लढत अशी संकल्पना समोर आणल्याचे वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. …

Read More »

आरएसएसचा अजेंडा हाणून पाडण्यासाठी भीमशक्तीचा काँग्रेस आघाडीला पाठिंबा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून भारताला हिंदू राष्ट्र बनवणे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना बदलणे हा त्यांचा अजेंडा आहे. भाजपाचा ४०० पारचा नारा हा दोन तृतियांश बहुमतासाठी असून एवढे बहुमत मिळाले की भाजपा राज्यघटना बदलणार हे भाजपाचे नेतेच जाहीरपणे सांगत आहेत. आरएसएस व भाजपाचा …

Read More »

राहुल गांधी यांची हमी, …लोकशाहीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

लोकसभा निवडणूकीला सुरुवात झाल्यानंतर आयकर विभागाने नव्याने काँग्रेस पक्षाला नोटीस पाठवित १८०० कोटी रूपयांचा दंड ठोठावला. मागील वर्षी आयकर परतावा दाखल आयकर विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आल्याने आयकर विभागाने ही नोटीस बजावली आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सत्ताधारी भाजपावर जोरदार निशाणा साधला. एक्स या …

Read More »

आयकर विभागाची काँग्रेसला पुन्हा १ हजार ८२३ कोटी रूपयांची नवी नोटीस

लोकसभा निवडणूका जाहिर झाल्यापासून काँग्रेसच्या मागे आयकर विभागाने सातत्याने नोटीसींचा सिलसिला सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने १४ लाख रूपयांसाठी ११० पट्टीत दंडाची रक्कम ठोठावत काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठावली. त्यानंतर गेल्यावर्षीच्या टॅक्स रिटर्नमधील तफावतीवरून १ हजार ८२३ कोटी रूपयांची काँग्रेसला पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. या नोटीशीची माहिती …

Read More »

वकिलांच्या पत्राची पंतप्रधान मोदींकडून तात्काळ दखल तर काँग्रेसचा पलटवार

देशभरातील विविध न्यायालयात भाजपाच्यावतीने न्यायालयात वकीलपत्र दाखल करत कायदेशीर बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांच्यासह मानन कुमार मिश्री, अदिश अगरवाल, चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, उज्वला पवार, उदय होल्ला, स्वरूपमा चतुर्वेदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांना पत्र लिहित न्यायपालिकेच्या कारभाराच्या अनुषंगाने काही मुद्दे उपस्थित केले. …

Read More »