Breaking News

Tag Archives: bjp

नाना पटोले यांची मागणी, मीरा बोरवणकरांच्या आरोपांची न्यायमूर्तीमार्फत चौकशी करा चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यमुक्त करा

माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. अजित पवार यांनी सरकारी जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता असा गंभीर आरोप बोरवणकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे. मीरा बोरवणकर यांनी केलेल्या या गंभीर आरोपांची …

Read More »

शिंदे गटाचे खासदार ठाम, आपण २२ जागांचीच भाजपाकडे मागणी करायची ठाकरे गटाच्याही जागांवर दावा करणार

शिवसेना कोणाची यावरील निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असताना लोकसभा निवडणूकीला आता काही महिन्यांचा अवधी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या गटाच्या खासदारांची बैठक झाली. या बैठकीत शिंदे गटाच्या खासदारांबरोबरच विद्यमान ठाकरे गटाच्या खासदारांच्या जागा भाजपाकडे मागणी करायच्याच अशी …

Read More »

राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्राची अभिनव संकल्पना, मुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील तरुणांच्या रोजगार संधी आणि त्यांना स्वावलंबी करण्याला प्राधान्य दिले आहे. अशा या महाराष्ट्राच्या अभिनव संकल्पनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणे, ही बाब देखील …

Read More »

“गर्वसे कहो हम एमआयएम हैं ” सुध्दा भविष्यात उबाठा म्हणेल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची घोषणा “गर्वसे कहो हम हिंदू है” होती. आता उद्धव ठाकरे यांनी “गर्वसे कहो हम समाजवादी हैं ” अशी केली आहे. आदित्य ठाकरेपर्यंत पोहोचल्यावर “गर्वसे कहो हम एमआयएम हैं” असेही व्हायला कमी पडणार नाही, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. …

Read More »

अजित पवारांचा जमिनीच्या लिलावासाठी दबाव; मीरा बोरवणकर यांचा खळबळजनक खुलासा नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन माजी आयपीएस दधिकारी मीरा बोरवणकर यांचा खळबळजनक खुलासा

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकात केलेल्या खुलासानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात पोलीस जमिनीच्या झालेल्या गैर व्यवहाराचा उल्लेख करून राज्याच्या राजकारणात दादा म्हंटल जाणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करून थेट तत्कालीन पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बोट …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप,… अपघात रोखण्यास सरकार अपयशी घटनेची चौकशी करून दोषी कारवाई करावी

समृद्धी महामार्गावर सतत घडणाऱ्या अपघातातून राज्य शासनाने कसलाही बोध घेतला नाही. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराजवळ समृद्धी महामार्गावर घडलेला अपघात नसून व्यवस्थात्मक पद्धतीने हत्या असून समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यास सरकार स्पशेल अपयशी ठरले असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. आज रात्री घडलेल्या अपघाताची दानवे यांनी सर्वप्रथम घटनास्थळी जाऊन पाहणी …

Read More »

शरद पवार म्हणाले, तुमच्या राष्ट्रवादीचं म्हणण बरोबर असल्याचे लवकरच कळेल… बॅलार्ड पिअर्स येथील जाहिर सभेत शरद पवार यांच सुतोवाचं

मध्यंतरी आपल्या पक्षातील काही जणांनी वेगळा विचार करून वेगळा निर्णय घेतला. तसेच त्यांनी त्यांचा अध्यक्ष निवडल्याचेही वर्तमान पत्रात वाचलं. पण तुम्ही निवडलेला अध्यक्ष तुरुंगात गेला हे मला माहित आहे. पण त्यांनी निवडलेला अध्यक्ष तुरुंगात गेला की नाही मला माहित नाही असा टोला अजित पवार आणि गटाचे नाव न घेता राष्ट्रवादी …

Read More »

उद्धव ठाकरे म्हणाले, केवळ जागा मिळतील म्हणून भाजपा सोबत आला …. गुजरातमध्ये पाकिस्तानी संघावर फुले उधळता मग समाजवाद्यांशी बोललो तर कुठे बिघडलं

महाराष्ट्राने मुंबई मिळवली. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीत प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, कॉम्रेड श्रीपाद डांगे यांच्यासह सर्वजण महाराष्ट्रासाठी एकत्रित आले. त्यावेळी तेव्हाचा जनसंघ आणि आताचा भाजपा कुठे होता. ते तर ना स्वातंत्र्य लढ्यात होते ना महाराष्ट्राला मुंबई मिळावी या लढ्यात होते. पण त्यावेळी होत असलेल्या निवडणूकांमध्ये काही जागा मिळतील म्हणून त्यावेळचा …

Read More »

…देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केले जातेय आ. प्रविण दरेकर यांचा आरोप

आज आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केले. त्याला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका विशिष्ट समाजाचे असल्याने त्यांना टार्गेट केले जातेय, असा आरोप दरेकर यांनी केला. …

Read More »

राहुल नार्वेकर स्पष्टोक्ती, निकालपत्रात दोन महिन्याचा उल्लेखच नाही…. विधिमंडळाच्या सार्वोभौमत्वाशी तडजोड नाही

राज्यातील सत्तासंघर्षातील शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर आणि अपात्र आमदारांच्याबाबत मे महिन्यात निकाल देऊनही अद्याप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अंतिम निकाल दिला नाही. या विरोधात ठाकरे गटाच्यावतीने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने नव्याने वेळापत्रक सोमवारपर्यंत दाखल करण्याचे आदेश देत दररोज सुनावणी घेऊन दोन महिन्यात अंतिम …

Read More »