Breaking News

अजित पवारांचा जमिनीच्या लिलावासाठी दबाव; मीरा बोरवणकर यांचा खळबळजनक खुलासा नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन माजी आयपीएस दधिकारी मीरा बोरवणकर यांचा खळबळजनक खुलासा

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकात केलेल्या खुलासानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात पोलीस जमिनीच्या झालेल्या गैर व्यवहाराचा उल्लेख करून राज्याच्या राजकारणात दादा म्हंटल जाणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करून थेट तत्कालीन पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बोट केले. बोरवणकर यांनी पुस्तकात केलेल्या धक्कदायक विधानामुळे राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.

अशातच मीरा बोरवणकर यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन अजित पवार आणि त्यांच्या पुस्तकाविषयी सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांवर भाष्य केले. या पुस्तकात एकूण ३८ प्रकरणे असून एकतर्फी प्रेमात तरुणीची झालेली हत्या, जळगाव सेक्स स्कँडल, मानवी तस्करी अशी विविध प्रकरणाचा या पुस्तकात उल्लेख आहेत. या सर्व प्रकरणाबद्दल विचारलं फक्त एकाच प्रकरणावर जास्त प्रश्न विचारू नका असे प्रतिउत्तर पत्रकार परिषदेत पत्रकाराच्या प्रतिउत्तेरला दिले होते.

पुढे अजित पवार प्रकरणाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, पुणे पोलिसांच्या अधिपत्याखाली असलेल्या जमिनीच्या लिलावासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली होती. त्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली. माझ्याकडे कार्यभार असल्याने ही जमिनीवरील ताबा सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली होती. अजित पवारांनीदेखील हाच आग्रह धरला होता. लिलाव झाल्याने आता हस्तांतरण प्रक्रिया सुरू करा असे त्यांनी म्हटले.

मात्र ही जागा पुणे पोलीस खाते यांच्या साठी महत्वाची होती. पुणे पोलीस आयुक्तालयाची नवी इमारत तसेच पुणे पोलीस गृहसंकुलन यासाठी वापरात येऊ शकते. त्यामुळे मी त्या तीन एकर जमिनीच्या लिलावाला आक्षेप घेत हस्तांतरणाला विरोध केला असल्याचे बोरवणकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. सदर शाहीद बलवा या विकासकाला देण्यात येणार होती. लिलावात त्यांनी बाजी मारली. मात्र, 2 जी घोटाळ्यात पुढे सीबीआयने अटक केल्याने सरकारची संभाव्य होणारी अवहेलना टळली अशी माहिती सुद्धा त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी…

सरकारच्या आशिर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *