Breaking News

सुशांत सिंगप्रकरणी प्रेस कौन्सिलने प्रसार माध्यमांना करून दिली पत्रकारीतेची आठवण कव्हरेजचा अतिरेक होतोय

मुंबई: प्रतिनिधी

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सुरु असताना प्रसारमाध्यमांकडून विशेषत: टीव्ही चॅनेल्सकडून अतिरेक होत असल्याने कव्हरेजबद्दल पहिल्यांदाज प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत पत्रकारीता धर्माची आठवण करून दिली. यासंदर्भात प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडून ट्विट करत यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

सुशांत सिंग राजपूतने आत्महत्याप्रकरणाला राजकिय वळण लागले. सदर प्रकरणाचा तपास आता सीबीआय, ईडी, नार्कोटीक्ससह इतर संस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र या प्रकरणात सिंग याची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तीच्या कुटुंबियांच्या अनुषंगाने आणि तपासाच्या अनुषंगाने प्रत्येक गोष्टीचा अतिरेक पध्दतीने कव्हरेज देण्यात येत आहे. त्याबद्दल प्रेस कौन्सिल इंडियाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच सर्व प्रसारमाध्यमांना पत्रकारतीच्या मार्गदर्शक तत्वाची आठवण करून दिली.

 

Check Also

आठवलेंना त्यांच्याच कविता स्टाईलमधून गृहमंत्र्यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या वाढदिनाचे औचित्य

मुंबई : प्रतिनिधी आज नाताळचा दिवस असल्याने सर्वत्र उत्सवाचे वातावरण असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *