Breaking News

मोबाईल फोनला दोन स्पीकर का असतात? तुम्हाला मायक्रोफोनबद्दल या दोन गोष्टी माहिती आहेत का ?

मोबाईल अर्थात स्मार्टफोन खरेदी करताना युजर्स रॅम, प्रोसेसर, डिस्प्ले, स्क्रीन, रिझोल्युशन आणि इतर गोष्टींबद्दल नक्कीच माहिती असते. पण या शिवायही फोनमध्ये इतर अनेक फीचर्स व गोष्टी दिलेल्या असतात, ज्या महत्त्वाच्या असतात. आपल्या फोनचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मायक्रोफोन याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते. फोनवर बोलण्यासाठी मायक्रोफोन खूप गरजेचे आहेत. पण विशेष म्हणजे याबाबत तपशीलवार जाणून घेण्याचा युजर कधीही प्रयत्न करत नाहीत, कारण त्यांना त्या मायक्रोफोनचा वापर नक्की काय आहे, तेच माहीत नसतं.

तुम्हीही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मायक्रोफोनबद्दल माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण मायक्रोफोनशिवाय तुम्ही स्मार्टफोनवर बोलू शकत नाही आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या आवाजाविषयीही आपल्याला काही कळत नाही. फोनमधील दोन्ही मायक्रोफोनचं काम वेगवेगळं असतं, ते नक्की काय असतं, जाणून घेऊयात. याबाबत ‘एबीपी लाइव्ह’ने वृत्त दिलंय.

चला दोन्ही मायक्रोफोन्सच्या कामाबद्दल थोडं जाणून घेऊयात. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण प्रत्येक स्मार्टफोनच्या खालच्या भागात एक लहान छिद्र असतं. त्याच्या आत एक माइक ठेवलेला असतो. तो नेहमी आपल्या ओठांच्या जवळ असतो, जेणेकरून तो आपला आवाज त्वरित कॅच करू शकेल. हा माइक आपला आवाज दुसऱ्या युजरपर्यंत पोहोचवतो.

तर, दुसरा मायक्रोफोन वर कानाजवळ असतो. या माइकमधून आवाज निघत नाही, अशा वेळी मनात विचार येतो की यात आवाज येत नाही, तर मग याचं काम नेमकं काय आहे? तर आम्ही तुम्हाला त्यामागचं कारण सांगतो. तो कानाजवळील माइक हा तुमच्या आजूबाजूचा जो गोंधळ असतो तो रोखतो.

एक महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा आपण फोनवर बोलतो तेव्हा दोन्ही माइक एकाच वेळी सक्रिय असतात. खालचा माइक तुमचा आवाज ओळखतो आणि वरचा माइक आसपासचा गोंधळ व आवाज ओळखतो. दोन्ही आवाज स्मार्टफोनच्या सॉफ्टवेअरपर्यंत पोहोचतात. इथे तुमचा स्मार्टफोन अतिशय हुशारीने वरच्या मायक्रोफोनमधून येणारा आसपासचा गोंधळ काढून टाकतो.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *