Breaking News

आयआरसीटीसीची गुंतवणूकदारांना खूशखबर लाभांश देण्याची केली घोषणा

आयआरसीटीसी अर्थात  इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत आयआरसीटीसीने २९४.६७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. आयआरसीटीसीने आपल्या गुंतवणूकदारांना खूशखबर दिली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील २२६.०३ कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण ३०.३६ टक्के अधिक आहे. बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने निकाल जाहीर केले आहेत. आयआरसीटीसी शेअर मंळवारी १.४१ टक्क्यांनी वाढून ६८०.८५ रुपयांवर बंद झाला.

सप्टेंबर तिमाहीत आयआरसीटीसीचा एकूण महसूल ९९५.३१ कोटी रुपये आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत ८०५.८० कोटी रुपयांच्या तुलनेत २३.५१ टक्क्यांनी अधिक आहे. तिमाहीत EBITDA २०.२ टक्क्यांनी वाढून ३६.५ कोटी रुपये झाला. EBIDTA मार्जिन मागील वर्षीच्या ३७.८ टक्क्यांच्या तुलनेत ३६.८ टक्के राहिला.

कंपनीच्या संचालक मंडळाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर २.५० रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. लभांश १६० कोटींच्या पेड-अप भाग भांडवलाच्या १२४ टक्के आहे. संचालक मंडळाने १७ नोव्हेंबर २०२३ ही आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी अंतरिम लाभांश भरण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *