Breaking News

सिद्धार्थ रे ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला पण…..

‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीनं बघतात. या चित्रपटामधील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटात दिवंगत अभिनेता सिद्धार्थ रे यानं शंतनू ही भूमिका साकारली. सिद्धार्थनं मराठी चित्रपटासोबत हिंदी चित्रपटात देखील काम केलं. सिद्धार्थनं चित्रपटष्टीमध्ये येण्यासाठी त्याचं नाव देखील बदललं होतं. जाणून घेऊयात सिद्धार्थच्या खऱ्या नावाबद्दल…

१९७७ मध्ये रिलीज झालेल्या व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या चानी या चित्रपटामध्ये सिद्धार्थ रे यानं काम केलं. १९८० च्या दरम्यान सिद्धार्थनं थोडी सी बेवफाई या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. सिद्धार्थ रे याचे खरे नाव हे सुशांत असे आहे. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी सिद्धार्थने नाव बदललं होत.

थोडी सी बेवफाई या चित्रपटानंतर गंगा का वचन, वंश, युद्धपथ, परवाने, बाजीगर, मिलिट्री राज, बिच्छू, पिता, जानी दुश्मन: एक अनोखी प्रेम कहानी या हिंदी चित्रपटामध्ये देखील काम केलं. जैत रे जैत या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं.बाजीगर या चित्रपटात सिद्धार्थ रेनं इस्पेक्टर करण ही भूमिका साकारली होती.

‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात शंतनू ही भूमिका सिद्धार्थ रे यानं साकारली. हा चित्रपट १९८८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिद्धार्थ रेसोबतच या चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगावकर, प्रिया बेर्डे, सुधिर जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी देखील काम केलं. सिद्धार्थनं  अभिनेत्री शांतीप्रियासोबत लग्न केलं. शांतीप्रिया आणि सिद्धार्थ यांच्या मुलाचं नाव शिष्या रे असं आहे.

Check Also

टायगर ३’ने पहिल्याच दिवशी मोडला ‘गदर २’चा रेकॉर्ड

अभिनेता सलमान खानने यंदाच्या दिवाळीत चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं. दिवाळीच्या मुहुर्तावर सलमानचा ‘टायगर ३’ प्रेक्षकांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *