Breaking News

सलमान खान समोर आल्यानंतर आजही ऐश्वर्या राय.. त्या व्हिडिओमुळे सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील नातं

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता सलमान खान यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. दोघांच्या ब्रेकअपला देखील अनेक वर्ष उलटली आहेत. तर ऐश्वर्या हिने अभिनेता अमिताभ बच्चन यांचे पुत्र अभिषेक बच्चन यांच्या बरोबर विवाह केला. आज ऐश्वर्या आणि अभिषेक यांना आराध्य नावाची मुलगी सुद्धा आहे.

सलमान खान त्यांच्या आयुष्यात आनंदी आहे, तर दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या आयुष्यात फार पुढे गेली आहे. तरी देखील दोघांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. अनेक ठिकाणी दोघे एकत्र दिसतात, पण एकमेकांना पाहिल्यानंतर देखील समोर येत नाहीत. दोघे कायम कोणत्याही कार्यक्रमात एका छताखाली असल्यास दूर राहण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

सध्या ऐश्वर्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. नुकताच झालेल्या एका पार्टीतील व्हिडीओ समोर येत आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझानयर मनिषा मल्होत्रा याने पार्टीचं आयोजन केलं होतं. पार्टीत बॉलिवूडचे अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आले होते. सलमान खान आणि ऐश्वर्या राय देखील पार्टीत उपस्थित होते. पण सलमान खान येताच ऐश्वर्या पार्टीतून निघाली अशी चर्चा देखील बॉलीवूड मध्ये चांगलीच रंगली आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

किराया अडवाणी आणि सईद जाफरी यांच्यात आहे खास नाते

कियारा अडवाणी ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक हीट चित्रपट तिने दिले आहेत. सोशल मीडियावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *