Breaking News

मोदी सरकारने पेगॅसिस सॉफ्टवेअर खरेदी केल्याचा न्युयॉर्क टाईम्सचा गौप्यस्फोट: मुळ बातमी वाचा देशाच्या राजकारणात पडसाद

मराठी ई-बातम्या टीम

मागील काही वर्षापासून देशातील राजकिय नेत्यांबरोबरच पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्ये यांच्यावर मोदी सरकारने पेगॅसीस सॉफ्टवेअरचा वापर करत पाळत ठेवल्याचा आरोप अनेक राजकिय नेत्यांकडून आणि द वायर या संस्थेने इव्हेस्टीगेटीव्ह जर्नालिझमच्या माध्यममातून उघडकीस आणला. त्यानंतर न्युयॉर्क टाईम्सने यासंदर्भात वृत शुक्रवारी प्रसारीत केले. त्यानंतर भारतीय राजकारणात याचे पडसाद उमटले आहेत.

विशेष म्हणजे या पेगॅसिसवरून सर्वोच्च न्यायालयात याप्रश्नी सुणावनी सुरु असताना आता नव्याने काही माहिती न्युयॉर्क टाईम्सने प्रकाशित केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने प्रसारीत केलेल्या वृत्तानुसार इस्राईलमधील एनएसओ (NSO) या खासगी कंपनीने राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि अगदी न्यायपालिकेतील लोकांवर पाळत ठेवण्यासाठी भारत सरकारकडून वापर केला जात असल्यासंदर्भातील दावा केला. तसेच हे सॉफ्टवेअर सरकारने २०१७ साली इस्राईलसोबत २ बिलियनचा शस्त्रास्त्र करार केला तेव्हा विकत घेतल्याचा गौप्यस्फोट केला.

त्याचबरोबर भारताबरोबरच अमेरिकेसह अन्य काही देशांनीही हे सॉफ्टवेअर खरेदी केल्याची खळबळजनक माहिती उघड करत अमेरिकेतही या पध्दतीने वापर करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. परंतु एक वर्षानंतर सदरचा प्रयत्न सोडून देण्यात आल्याचा दावाही या वृत्तपत्राने केला.

भारत सरकारकडून अधिकृतपणे पेगॅससची खरेदीची कबुली देण्यात आलेली नाही. मात्र न्यूयार्क टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये भारतासह काही देशांनी पेगॅसस स्पायवेअरची पेगॅसस खरेदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१७ मधील इस्राईल भेटीचाही संबंध असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै २०१७ मध्ये इस्राईल दौऱ्यावर गेले तेव्हा भारताने इस्राईलसोबत २ बिलियनचा शस्त्रास्त्र करार केला. यात क्षेपणास्त्र यंत्रणेसह पेगॅसस स्पायवेअरचा देखील समावेश असल्याचं न्यूयार्क टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.

२०१७ च्या इस्राईल दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन इस्राईल पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यात २ बिलियनच्या शस्त्रस्त्र खरेदीचा करार झाला. यातच क्षेपणास्त्र यंत्रणेसोबत पेगॅससचा समावेश होता. यानंतर नेत्यान्याहू यांनी जून २०१९ मध्ये भारत दौरा केला. यानंतर भारताने संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत पॅलेस्टाईन मानवाधिकार संघटनेच्या मान्यतेवर इस्राईलच्या बाजूने मतदान केले. आतापर्यंत भारत किंवा इस्राईलपैकी कोणीही पेगॅसस खरेदीला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यासंदर्भातील एका वृर्तमान पत्रात छापून आलेली बातमी ट्विट करत भाजपाने देशद्रोह केल्याचा आरोप केला.

न्युयॉर्क टाईम्सचे मुळ वृत्त वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:-

https://www.nytimes.com/2022/01/28/magazine/nso-group-israel-spyware.html

Check Also

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *