Breaking News

कबड्डी लीगसाठी १८० खेळाडूंची निवड आणि लिलाव प्रक्रिया इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीगची लवकरच सुरुवात

मुंबईः प्रतिनिधी
भारतीय कबड्डीला आंतरराष्ट्रीयस्तरावर लोकप्रियता आणि गेल्या तीन दशकांपासून पाहिलेल्या ऑलिम्पिक प्रवेशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवकरच इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीग सुरू होणार आहे. या लीगची भव्य आणि दिव्य तयारी सध्या सुरू असून येत्या १५ ते १७ मार्चदरम्यान नवीन कबड्डी महासंघच्या (एनकेएफ) माध्यमातून कबड्डी प्रीमियर लीगसाठी फ्रेंचायझीजच्या संघांची अंतिम निवड आणि १८० खेळाडूंवर बोली लावण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती महासंघाचे सरचिटणीस प्रसाद बाबू यांनी दिली.
एनकेएफने गेल्या दोन महिन्यात देशभरातील वेगवेगळ्या आठ केंद्रांवर मोठ्या प्रमाणात निवड चाचणी आयोजित केली होती. या चाचणीला कबड्डी खेळाडूंचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता. त्या चाचणीतून दमदार आणि जोरदार अशा १८० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंवर घसघशीत रकमेची बोली लावून त्यांचा लिलाव पुढील तीन दिवस पुण्याच्या म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात केला जाईल. सर्व खेळाडूंना ए, बी आणि सी अशा तीन श्रेणीत विभागण्यात आले आहे. ज्यात खेळाडूंची मुळ किंमत वैयक्तिकरित्या क्रमशा दहा, आठ आणि सहा लाख रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत तामिळनाडूतील इरोड, आंध्रप्रदेशातील विजयवाडा, हरयाणातील रोहतक, हिमाचल प्रदेशातील उना तसेच पुणे, दिलल, बंगळुरू आणि कोलकात्यात पार पडलेल्dया निवड चाचणीतून जबरदस्त १८० खेळाडूंची निवड कबड्डीतल्या ज्येष्ठ आणि अनुभवी खेळाडूंनी केली आहे. या निवडीत देशभरातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग आहे. ही पहिलीवहिली इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीगला घराघरांत पोहोचविण्यासाठी या लीगच्या थेट प्रक्षेपणाची जबाबदारी डिस्कवरी चॅनेलच्या परिवारातील डीव्ही स्पोर्टस् या क्रीडा वाहिनीने स्वीकारली आहे. लवकरच लीगच्या कार्यक्रमाची आणि लीगमध्ये खेळणाऱया संघांची आणि फ्रेंचाइजीझच्या नावांची घोषणा केली जाईल असेही त्यांनी पत्रकाद्वारे सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *