Breaking News

नीती आयोगाच्या माजी सल्लागाराकडून पंतप्रधान मोदींवर टीकेचा भडीभार आर्थिक निती आणि कोविड परिस्थितीवरून डॉ.अरिंदम चौधरीचा हल्लाबोल

मुंबई: प्रतिनिधी

देशाच्या नियोजन आयोगाचे नाव बदलून नीती आयोगाची स्थापना केल्यानंतर आर्थिक आणि इतर क्षेत्रातील तज्ञांची सदस्य म्हणून नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या अनेक सदस्यांच्या समिचीचे सल्लागार असलेले आणि आयआयपीएम संस्थेचे संस्थापक कि-नोट स्पीकर डॉ.अरिंदम चौधरी यांनी केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान मोदींच्या धोरणा विरोधात सोशल मिडीयातून चांगलाच टीकेचा भडिमार सुरु केल्याचे दिसून येत आहे.

डॉ.अरिंदम चौधरी हे प्रसिध्द अशा आयआयपीएम संस्थेचे संस्थापक आहेत. तसेच ते नीती आयोगाचे सदस्य म्हणून राहीलेले आहेत. त्यांचे ट्विटर आणि फेसबुकवर प्रोफाईल आहेत. त्यांनी नुकतीच अर्थात काल शुक्रवारी भाजपाच्या अंधभक्तांवर उपरोधिक टोलेबाजी केले.

त्यांनी ट्विटरवर low IQ divisive fanatics असा शब्द करत ‌Bhakts are so cute असे ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विटवर एकाने low IQ divisive fanatics चा अर्थ विचारला. त्यावर चौधरी यांनी उत्तर देताना या वाक्यप्रयोगाचा अर्थ सांगताना म्हणाले की, मंदबुध्दी बटवारा करनेवाले कट्टरपंथी किरे असे स्पष्ट केले.

त्यानंतर ३० जून २०२१ रोजी त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत सद्यपरिस्थितीत देशात फक्त जोक्स अर्थात विनोदच लिहिण्याला परवानगी आहे. खरी पत्रकारीता आणि लिखाणावर बंदी असून जरी एखाद्याने तसे धाडस केले तर एकेकाला शोधून मारले जात आहे. त्यामुळे बुध्दीमान व्यंगचित्रकारांकडून चांगले काम करत आहेत. मी लिहीत असलेल्या गोष्टींवर भक्तांकडून जी भाषा वापरण्यात येते त्यामुळे मी व्यथित आहे. या पोस्टसोबत त्यांनी मोदींच्या १८ तास कामाच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह करणारे उपरोधिक व्यंगचित्रही पोस्ट केले आहे.

याशिवाय पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर ही प्रश्नचिन्ह उभे करत ५६ इंचाच्या छातीच्या नेत्यांकडून ११२ रूपये प्रति लीटर पेट्रोल किंमतीवरून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे व्यंगचित्र पोस्ट केले. त्यामुळे नीती आयोगाच्या आजी-माजी सदस्यांना आता मोदी यांच्या कारभारातील चुकांवर बोट ठेवले जात असल्याचे दिसून येत आहे.

तसेच देशाला दे‌वांच्या आणि गाईच्या मुर्खपणाच्या भ्रामक संकल्पनातून बाहेर काढून विज्ञानाकडे न्यायला हवे अशी सूचनाही एका पोस्टमध्ये त्यांनी केली.

https://www.facebook.com/dr.arindamchaudhuri

https://twitter.com/DrArindam_IIPM/status/1408296949732679681?s=20

Check Also

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *