Breaking News

संरक्षण दलासाठी साहित्य बनविणाऱ्या सोलार कंपनीत स्फोट

देशातील संरक्षण विभागाशी निगडीत साहित्यांची निर्मिती करणाऱ्या नागपूर येथील सोलार इंडस्ट्रीज कंपनीत आज सकाळी ९च्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात ६ महिलांसह ९ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्या स्फोटामुळे सोलार एक्सप्लोसिव्ह इंडस्ट्रीजच्या आजबाजूचा परिसर हादरून गेला.

सोलार ही कंपनी नागपूरातील बाजार गाव येथे उभारण्यात आली आहे. या सोलार कंपनीत स्फोटक बनविण्याचे काम सुरु असताना स्फोट झाल्याचे सांगण्यात येत येत आहे.

सोलार कंपनीकडून बनविण्यात येणाऱा दारूगोळा संरक्षण विषयक कंपन्यांना पुरविण्यात येतो. एक्सप्लोझिव्ह मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर करण्यात येतो. या केमिकलचा वापर करत असतानाच हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या दुर्घटनेनंतर तातडीने पोलिसांनी धाव घेत जखमी झालेल्यांना आणि मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु केले. याशिवाय दुर्घटनेत आणखी काही कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करत त्यांचाही शोध घेण्यात आला. यापार्श्वबभूमीवर जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात यावे याकरिता रूग्णवाहिकाही कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ तैनात करण्यात आली.

स्फोटाच्या दुर्घटनेमध्ये ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती नागपूरचे पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मृतांमध्ये युवराज चरोदे, ओमेश्वर मछिर्के, मिता युकी, आरती सहारे, श्वेताली मारबते, पुष्पा मनपुरे, भाग्यश्री लोणारे, रूमिता युकी, मोसम पटेल यांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले.

दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच प्रशासनाला योग्य ती निर्देशही दिले.

तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दुर्घटनेतील मृतांना श्रध्दांजली वाहत, मृत्यांच्या कुटुंबियाना ५० लाख रूपयांची आर्थिक मदत द्या आणि कुंटुंबातील व्यक्तीला नोकरी द्या अशी मागणी केली.

तसेच या कंपनीतील स्फोटाची दुर्घटना कंपनीच्या बेजबाबदार व्यवस्थापनामुळेच घडल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, कंपनी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. यापूर्वी सुद्धा अश्या घटना सदर कंपनीत घडल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच कंपनीमुळे परिसरातील पर्यावरणाचे होत असलेले नुकसान ही गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे असेही नमूद केले.

विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकारने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन एसआयटी स्थापन करावी आणि दोषी असलेल्या कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करावे ही मागणी केली.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *