Breaking News

कोल्हापूरकरांच्या रोषाला चंद्रकांत पाटील घाबरले पुण्यातून घेतली उमेदवारी

कोल्हापूर-मुंबईः प्रतिनिधी
कृष्णा आणि पंचगंगेला आलेल्या पुरामुळे कोल्हापूर जिल्हा पूर्णतः पाण्याखाली गेला. मात्र कोल्हापूरचे रहिवासी असलेले राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपाप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करवीरवासीयांच्या मदतीला धावण्याऐवजी पुण्यात राहणे पसंत केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली. या टीकेची परिणती विधानसभा निवडणूकीत होवू नये म्हणून नियोजित शिराळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याऐवजी पाटील यांनी पुणे शहरातील कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केल्याची माहिती भाजपामधील सुत्रांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मागील अनेक वर्षे कोल्हापूरमध्ये रहात आहेत. तसेच विधान परिषदेवर निवडूण आल्यानंतरही त्यांनी कोल्हापूरात राहूनच राजकिय वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्यात सत्ता आल्यानंतर आणि मंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूरातील कार्यकर्त्यांशी संपर्क कमी झाला. त्यातच कधीकाळी रस्त्याने जाताना एखादा भाजपा-राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा कार्यकर्ता दिसला तर त्याच्यासाठी गाडी थांबविणारे चंद्रकांत पाटील हे मंत्री झाल्यानंतर गाडी थांबविणे तर दूरच गाडीची काच खाली घेवून हात करायला विसरल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच मंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या एकांकी कारभाराला कंटाळून स्थानिक भागातील भाजपाचे निष्ठावान आणि जून्या कार्यकर्त्यांनी पाटील यांच्याविरोधात बहिष्काराचे हत्यार उपसले. त्यामुळे अखेर चंद्रकांत पाटील यांनी या सर्व कार्यकर्त्यांची भेट घेत माफी मागितली. यामुळे या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरील नाराजी सोडून दिल्याचे त्यांनी सांगितले.
परंतु पंचगंगेला आलेल्या पुरात सबंध जिल्हा पाण्याखाली गेला. लोकांचे हाल सुरु झाले. जनावरे मेली, आर्थिक नुकसान होत होते, शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला. मात्र कोल्हापूरचे रहिवाशी असलेले चंद्रकांत पाटील हे काही केल्या कोल्हापूरात पाऊल ठेवायला तयार झाले नाहीत. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौरा जाहीर केला, त्यावेळी ते कोल्हापूरात आल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्याचा मंत्री असताना पाटील यांच्याकडून अशा पध्दतीच्या वागणूकीची अपेक्षा नव्हती. त्यामुळे पाटील यांच्यासह भाजपाच्या सर्व उमेदवारांचे नीट भवितव्य विधानसभा निवडणूकीत ठरवायचा असा निर्धार स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्यांसह सर्वांनीच केला. त्यामुळे या पणला घाबरूनच पाटील यांनी कोल्हापूर ऐवजी पुण्यातील मतदारसंघाची निवड केल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *