Breaking News

सामाजिक

मुख्यमंत्री ठाकरेंच्या या भूमिकेचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासह १०४ व्यक्तींनी केले स्वागत राज्यपाल कोश्यारींना दिलेल्या प्रतित्तुरासह धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने उभे राहील्याबद्दल केले अभिनंदन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मंदीरे उघडण्याबाबत भाजपासह वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आंदोलनामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर दबाव आणत त्यांना चक्क धार्मिक भूमिका घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला. मात्र तरीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी धार्मिक भूमिका घेण्याऐवजी धर्मनिरपेक्ष अर्थात सेक्युलेरिझमच्या बाजूने उभे राहिल्याने मुख्यमंत्र्यांच्या या …

Read More »

अनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार प्रस्ताव तयार करण्याचे आणि अनाथ प्रमाणपत्र वितरणासाठी मोहिम राबविण्याचे राज्यमंत्री कडू याचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी अनाथ बालकांचा अनाथालयात प्रवेश झाल्यानंतर त्यांना तातडीने अनाथ प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या अनाथ बालकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देश महिला व बालकल्याण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, कामगार, बहुजन कल्याण विभाग राज्यमंत्री बच्चू कडू यांनी येथे दिले. तसेच मागासवर्गीयांच्या धर्तीवर अनाथ …

Read More »

आजू-बाजूला भीक मागतय का कोणी ? मग येथे माहिती पाठवा महिला व बालविकास आयुक्तालयाचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक ठिकाणी भीक मागणारी व्यक्ती आढळून आल्यास कायदेशीर पद्धतीचा अवलंब करुन संबंधितास भिक्षेकरी स्वीकार केंद्रात दाखल करुन घेण्यात येते. भिक्षेकऱ्याबाबत माहिती देऊ इच्छिणाऱ्यांनी संबंधित भिक्षेकऱ्याचे भीक मागतानाच्या छायाचित्रासह तारीख, शहर आदी माहिती [email protected] या ईमेलवर पाठवावी, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास आयुक्तांनी केले. महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम 1959 नुसार सार्वजनिक ठिकाणी भीक …

Read More »

घर कामगारांसाठी सर्वसमावेशक कायदा आणा; घरेलू कामगारांचा राष्ट्रीय मंचचे आंदोलन लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये मागण्यांचा प्रचार करणार

मुंबई : प्रतिनिधी नुकतेच केंद्र सरकारने अमनधपक्या पद्धतीने श्रमविरोधी कामगार कायद्यांच्या संहीतेला संसदेत मंजूर करून घेतले, ह्या हालचालींचा अंदाज देशातील कामगार संघटनांना होताच् आणि त्याच्या रोक थामासाठी संहीतेत कामगार व असंघटित कामगारांची बाजू मांडण्याचा व त्यात सुधारणा करण्याचा संसदीय मार्ग आपले म्हंणने पार्लमेंट सँन्डींग कमेटी, लेबर डिपार्टमेंट, सर्व पक्षीय खासदार …

Read More »

आंबेडकरी साहित्यिक डॉ.भाऊ लोखंडे यांचे निधन : अनेक मान्यवरांची आदरांजली वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नागपूर-मुंबई : प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्ये, रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे प्रणेते, बौध्द दलित साहित्यात चळवळीत महत्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यक डॉ भाऊ लोखंडे यांचे मंगळवारी पहाटे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा जन्म १५ जून १९४२ रोजी झाला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पाली विभागाचे ते रिडर आणि डॉ.बाबासाहेब …

Read More »

कौशल्य विकास योजनांचा लाभ घ्यायचाय तर सेवायोजन नोंदणी आधार लिंक करा बेरोजगारांना विभागाचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर किंवा कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना नोकरीसाठी सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पध्दतीने वेबसाइटच्या माध्यमातून देण्यात येतात. आपल्या नाव नोंदणीमध्ये अद्यापपर्यंत आधार नोंदणी क्रमांकाचा समावेश न केलेल्या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्ड वापरुन आधार कार्ड क्रमांकासह आवश्यक असलेली सर्व माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ३० सप्टेंबर २०२० पर्यंत …

Read More »

लहान बालकांमधील दिव्यांगत्व कमी करण्यासाठी ‘शीघ्र निदान, शीघ्र उपचार’ उपक्रम विशेष शिक्षकांच्या पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन- धनंजय मुंडे

मुंबई : प्रतिनिधी शून्य ते सहा वयोगटातील बालकांमधील दिव्यांगत्व वेळीच ओळखून त्यावर योग्य उपचार केल्यास त्या बालकास कायमचे दिव्यांग होण्यापासून रोखणे शक्य आहे. यासाठी राज्यातील दिव्यांगांच्या सर्व विशेष शाळांमध्ये ‘शीघ्र निदान, शीघ्र उपचार’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य …

Read More »

नवउद्योजकांसाठी डिक्कीने उभारले सुविधा केंद्र चेंबूरमध्ये उभारले कार्यालय

मुंबई : प्रतिनिधी दलित इंडियन चेंबर ॲाफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री अर्थात डिक्कीच्या मुंबई विभागातर्फे उद्योग सुविधा केंद्र उभारले आहे. उद्योजक, व्यावसायिक विशेषत: नवउद्योजकांसाठी हे सुविधा केंद्र लाभदायक ठरणार आहे. ऐस टेक्नॉलॉजिचे विशेष सहकार्य यासाठी मिळणार आहे. सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे , डिक्की महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष कांबळे, मुंबई विभाग …

Read More »

भीमा कोरेगाव आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची भीम आर्मी शिष्टमंडळाला आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीनंतर मुंबईसह राज्यभरात आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भीम आर्मीच्या शिष्टमंडळाला दिली. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथील क्रांतीस्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या देशभरातील आंबेडकरी अनुयायांवर हल्ले करण्यात आले होते. या दंगलीचे …

Read More »

भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य फिर्यादी आणि साक्षीदाराचे निधन ससून रूग्णालयात घेतला सुरेश सकट यांनी घेतला शेवटचा श्वास

पुणे : प्रतिनिधी भीमा-कोरेगाव हल्ल्यातील  मुख्य फिर्यादी व साक्षीदार असणारे सुरेश सकट यांचे आज पुणे येथील ससून रूग्णालयात  निधन झाले. भीमा कोरेगाव लढ्यात ते अग्रणी होते यामध्ये त्यांनी त्यांचे घरदार गमावले आहे. याच प्रकरणामुळे त्यांच्या अल्पवयीन मुलीची पूजा सकट हीची हत्या/ आत्महत्या देखील घडवण्यात आली होती. न्याया शिवाय आणि धर्मांतराच्या इच्छेशिवाय …

Read More »