Breaking News

घरेलू कामगारांना मिळणार सन्मानधन योजनेतून दहा हजार रुपये

राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत राज्यात घरेलू कामगार म्हणून काम करणाऱ्या आणि ५५ वर्ष पूर्ण केलेल्या घेरलू कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार असल्याची माहिती, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी यावेळी दिली.

जागर मुंबईचा या अभियानांतर्गत कामगारांसाठी चेंबूर येथे भाऊबीज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे, आमदार ॲड.अशिष शेलार, सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटना संस्थापक-अध्यक्ष सुभाष मराठे, नगरसेविका आशाताई मराठे आदी उपस्थित होते.

घरेलू कामगार हा आपल्या कुटुंबाचा भाग असतो. विभक्त कुटुंब पद्धतीत व बदलत्या जीवनशैलीमध्ये त्यांचे कुटुंबात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यामुळेच या घरेलू कामगारांचे जीवनमान हे आर्थिक तसेच सामाजिक स्तरावर अधिक उंचावण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शासनाने महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांना आर्थिक लाभ देण्यात येतो. पुढील काळात नोंदणीसाठीचे शुल्क नाममात्र करण्यात येणार असून त्यासोबतच आयुष्यभर लोकांची सेवा करणारे आणि समाजाचा अतिशय महत्त्वाचा घटक असलेल्या घरेलू कामगारांसाठी ज्यांचे वय ५५ वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा सर्व नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे सन्मान धन योजनेअंतर्गत १० हजार रुपयाचे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी कामगार मंत्री खाडे यांनी दिली.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *