Breaking News

आता मोबाईलवर नंबर आणि नावही दिसणार

रोज आपल्याला मोबाइलवर अनेक कॉल्स येत असतात. त्यात बरेच नको ते यापैकी काही कॉल्स स्पॅम किंवा टेलिमार्केटिंग कंपन्यांचे असतात. अशा कॉल्समुळे आपण सर्व वैतागून जातो. यावर उपाय म्हणून आपण डीएनडी हे ऑप्शन वापरतो; पण त्यामुळे फारसा फरक पडत नाही. त्यावर व्यक्तीचा मोबाइल नंबर स्क्रीनवर दिसतो. त्यामुळे तो कॉल नेमका कुणी केला आहे हे समजत नाही. काही वेळा स्कॅमर्स बॅंकेच्या नावाखाली आपल्याला कॉल करून फसवण्याचा प्रयत्न करतात. काही जण त्याला बळी पडतात. यावर उपाय योजना म्हणून टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने  एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ट्रायचा हा निर्णय कॉलर आयडेंटिटी फीचरशी संबंधित आहे. यामुळे मोबाइलवर कॉल आल्यावर कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव दिसणार आहे.

आपल्या मोबाईलवर स्पॅम कॉलमुळे सर्वच जण त्रस्त असतात. डीएनडी किंवा अन्य कोणतेही उपाय केले तरी टेलिमार्केटिंग कॉल्सपासून वाचणं जवळपास मुश्किल ठरतं. यातच फ्रॉड कॉल्सची समस्यादेखील आहे. स्कॅमर्स असे कॉल करून बॅंक एक्झिक्युटिव्ह किंवा अन्य कोणतीही व्यक्ती असल्याचं भासवून कॉल करतात.बऱ्याचदा यामुळे अनेकांचं नुकसान होतं. या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी ट्राय सध्या एका नवीन फीचरवर काम करत आहे. अद्याप या फीचरविषयी अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. कॉलर आयडेंटिटी या नवीन फीचरवर ट्राय काम करत आहे.हे फीचर सुरू झाल्यानंतर कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नावदेखील मोबाइल स्क्रीनवर दिसणार आहे. हे नाव केवायसीनुसार असेल. ज्या व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड असेल त्याचं नाव स्क्रीनवर दिसणार आहे. यासंबंधीचा नियम लागू झाल्यानंतर युझर्सला अशा कॉलरचं नावदेखील स्क्रीनवर दिसेल, ज्याचा मोबाइल क्रमांक फोनमध्ये सेव्ह नसेल.याकरीता कोणतेही वेगळं अ‍ॅप डाउनलोड करावं लागणार नाही.मात्र या करीता तीन आठवड्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

ट्रायची ही सुविधा सुरू झाल्यावर ट्रूकॉलर सारख्या अ‍ॅप्सची गरज भासणार नाही का, असा प्रश्न मनात निर्माण होत आहे. ट्रायच्या या आगामी सुविधेविषयी चर्चा सुरू झाली तेव्हा आमची त्या सेवेशी स्पर्धा नसेल, असं ट्रुकॉलरने स्पष्ट केलं होतं. ट्रायच्या कॉलर नेम डिस्प्लेशी सिस्टीमशी ट्रूकॉलरची थेट स्पर्धा नसेल, असं ट्रूकॉलरचे सीईओ आणि सहसंस्थापक अ‍ॅलन मेमेंडी यांनी मे २०२२ मध्ये सांगितलं होतं.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *