Breaking News

दलित, आदीवासींना शेत जमिन खरेदीसाठी १०० टक्के अनुदान देणार दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत देणार असल्याची मंत्री बडोले यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील दारिद्र रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भूमिहीन कुटुंबांना उत्पन्नाचे साधन म्हणून जमीन खरेदीकरीता दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेंतर्गत संपूर्ण अनुदान देण्यात येणार असून शेत जमिन खरेदीसाठी लागणाऱ्या अनुदानातही वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली.

विधानसभेतयासंबंधिचा तारांकित प्रश्न नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला होता. त्यावरील उपप्रश्नात हरिष पिंपळे, शशिकांत शिंदे, राजेंद्र पटणी, आदि सदस्यांनी भाग घेतला. भुमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटूंबांना उत्पन्नाचे साधन म्हणून शेत जमिन खरेदी करण्यासाठी दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबवण्यात येते, मात्र एकरइतक्या कमी दराने शेत जमिनी मिळत नाहीत. काही ठिकाणी बँका सहकार्य करीत नाहीत, अशी व्यथा सभागृहात मांडून त्यांनी योजनेतील रकमेची वाढ करण्याची मागणी केली .

या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री बडोले म्हणाले की, दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्र रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी यापूर्वी लाभार्थ्यांकडून ५० टक्के अनुदान व ५० टक्के कर्ज दिले जात होते. परंतु सरकारने यामध्ये बदल केला असून आता शंभरटक्के अनुदान लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

आतापर्यंत ५ हजार चारशे ६३ भुमिहिन लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. त्यासाठी दोनशे ७४ कोटी रूपये देण्यात आले. परंतु कोरडवाहू चार एकर अथवा बागायती दोन एकर प्रत्येकी तीन लाख रूपये एकरीइतक्या कमी दरात कुठेही जमिन मिळत नाही. त्यामुळे अडचण होते. यात पन्नास टक्के अनुदान आणि पन्नास टक्के बँकेचे कर्ज देण्यात येते परंतु काही बँकाही लाभार्थ्यांची अडचण करतात. त्यामुळे यावर तोडगा काढण्याचे शासनाच्या विचाराधिन होतेच. त्यामुळे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रक्कम वाढवण्यात येईल. दोन एकर बागायती जमिनीसाठी आठ लाख रूपये प्रति एकर तर चार एकर कोरडवाहू जमिनीसाठी पाच लाख रूपये प्रति एकर पर्यंत वाढ करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. याशिवाय बँकांकडून पन्नास टक्के कर्ज घेण्याची अट शिथील करून शासनाच्या वतीनेच शंभर टक्के अनुदान देण्यात येईल, असेही बडोले यांनी स्पष्ट केले.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

13 comments

  1. hi yojna kadhi chalu hoila

  2. राजेद्र शिंगाडे

    नमस्ते सर
    हि योजना नाशिक जिल्हामध्ये कधी चालू होणार आहे ह्या योजनेमध्ये अर्ज कोठे करायचा आहे या बद्दल माहिती दिलेली नाही त्या बाबत सविस्तर माहिती मिळावी व अनुसूचित जमातीच्या लोकांना पण याचा फायदा घेता येईल का या विषय मार्गदर्शन करावे हि विनंती
    अर्ज करण्याची संपूर्ण माहिती माझ्या Gmail वर पाठवा
    [email protected]

  3. दादासाहेब गायकवाड

  4. SUDHIR ASHOK TAKTODE

    बकवास आहे हि योजना

  5. sudhir ashok taktode

    बकवास आहे हि योजना

  6. Swab him an yojanecha namuna arj (form) pathawa

  7. He yojana ahamadnager Jilha madhe nahe ahe ka asl tar ya yojnaych labha kasa ghava

  8. jya candidate ch nav drd madhe nahi tyani kay karav

  9. कुणाल परसराम मोरे

    सर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना कधी चालु होणार आहे. त्याच्या साठी काय काय कागदपत्रे सादर करावे लागतील. हे कळवावे ही विनंती.

    • नमस्कार, आपण आपल्या स्थानिक सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा

  10. Nandurbar madhyam der nahi hi yojana samaj kalyan che adhikari laukki dro nigel tumhi shet vikreta aana ki kahi pan kara dro madhyam bhetal sangta hi yojana ashi aage ka sir sangana

  11. sir,Ma. Sir
       If this is the case with our Amravati division, please tell us where to contact.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *