Breaking News

राज ठाकरेंच्या टीकेला अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर, नदीत मृतदेह वहात नव्हते..

काल मनसेच्या गटनेत्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आजार पणाचे कारण सांगत तत्कालीन मुख्यमंत्री हे घराच्या बाहेर पडत नव्हते. परंतु एकनाथ शिंदे यांनी रात्रीतून अशी जादूची कांडी फिरवली की आता सगळे फिरायला लागले अशी टीका केली. त्यावर उध्दव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार करत हे सर्व जगाला माहिती आहे. त्यावेळी कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री बाहेर फिरत नव्हते, पंतप्रधानही बाहेर फिरत नव्हते. महत्त्वाचे म्हणजे, त्याकाळात अनेक सर्वेक्षणं केली जात होती. या सर्वेक्षणांमध्ये देशात उत्तम मुख्यमंत्री कोण? तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे नाव सातत्याने समोर येत होते. तसेच इतर राज्यांप्रमाणे मृतदेह नदीत वाहत नव्हते असे सांगितले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोना होता, हे सर्व जगाला माहिती आहे. त्यावेळी कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री बाहेर फिरत नव्हते, पंतप्रधानही बाहेर फिरत नव्हते. महत्त्वाचे म्हणजे, त्याकाळात अनेक सर्वेक्षणं केली जात होती. या सर्वेक्षणांमध्ये देशात उत्तम मुख्यमंत्री कोण? तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे नाव सातत्याने समोर येत होते. त्यावेळी त्यांनी कधी कौतुक केल्याचं मला आठवत नाही. चांगल्याला चांगलं म्हणावं हे बाळासाहेबांचे संस्कार आहेत. बाकीच्या राज्यांमध्ये जेव्हा नदीत मृतहेद तरंगत होती, तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला ऑक्सिजन कसा मिळेल, यावर उध्दव ठाकरे काम करत होते. त्यावेळी केंद्र सरकारही मदत करत नव्हते, अशा अनेक समस्यांवर मात करून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्राण वाचवले, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली.

कोरोना काळात कमी वेळेत टास्क फोर्स, रुग्णालयं स्थापन करण्यात आली. त्याचे कौतुक सर्वोच्च न्यायालयासह जागतिक आरोप संघटनेनेही केले होते. या गोष्टींचा तुम्हाला अभिमान वाटायला नको का?, असेही ते म्हणाले.

ज्या डॉक्टरांनी उद्धव ठाकरेंवर उपचार केले, कधी त्यांची मुलाखत घेऊन बघा. तेव्हा तुम्हाला कळेल, की उद्धव ठाकरे किती मोठ्या आजारातून बाहेर आले. इतक्या मोठ्या आजारावर मात करून ते आता बाहेर पडत आहेत. याचे त्यांना दुख आहे का? त्यामुळे राज ठाकरेंनी ज्याप्रकारे टीका केली ती त्यांना न शोभणारी आहे, अशी प्रत्युत्तरही त्यांनी दिले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *