Breaking News

‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्याकडून बंदी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्यमत्री एम.के स्टॅलीन यांच्याकडून आदेश जारी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यात वादग्रस्त ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी घातली आहे. त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना हा चित्रपट चालू असलेल्या स्क्रीनवरून काढून टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले. द्वेष आणि हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी, राज्यात शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचललं आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

‘द केरला स्टोरी’ ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाबद्दल बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, आधी ते काश्मीर फाईल्स घेऊन आले होते, आता ही केरळची कहाणी आहे आणि नंतर बंगाल फाईल्सची योजना आखत आहेत. भाजपा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहे? केरला स्टोरी हा चित्रपट चुकीच्या तथ्यांसह केरळला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.

द काश्मीर फाईल्स म्हणजे काय? हे एका विभागाचा अपमान करण्यासाठी आहे. ‘द केरळ स्टोरी’ म्हणजे काय?… ही रंगवलेली कथा आहे, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.
दरम्यान, ममता बॅनर्जी या दुसऱ्या बिगर-भाजपा मुख्यमंत्री आहेत ज्यांनी आपल्या राज्यात ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी घातली आहे. यापूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही चित्रपटाबाबत असेच आदेश जारी केले होते.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *