Breaking News

प्रकाश आंबेडकर म्हणाले, निवडणूक आयोगाला आपण Frankenstein करायला निघालो का? निवडणूक आयोग तटस्थता जपेल का?

राज्यातील शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचे चिन्ह कोणाचे यावरून सर्वोच्च न्यायालयात अद्यापही सुनावणी आहे. मात्र काल बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण कोणाचे याबाबतचा पुढील निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेण्यास परवानगी देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर बोलताना वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शंका उपस्थित केली. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे.

त्या व्हिडिओत प्रकाश आंबेडकर म्हणतात की, शिवसेनेच्या संदर्भात काल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वानाच बंधनकारक आहे. परंतु या निर्णयाचा आदर राखला जाईल का या बाबत शंका आहे असल्याचे सांगितले.

संविधानाने आणि संसदेने निवडणूक आयोगाची तटस्थता जपली होती, त्यांच्यावर शिंतोडे उडवले जाणार नाही याची दक्षता घेतली होती. परंतु निवडणूक आयोगाने स्वतःच्याच अधिकाराखाली Symbol Order 1968 जी काढली. त्यामध्ये Section 15 प्रमाणे एखाद्या पक्षात जर निवडणूक चिन्हावरून विवाद असेल तर आम्हांला हस्तक्षेप करता येतो असे प्रावधान केले. हे Syambol Order मधील section 15 संविधानिक आहे की नाही याची तपासणी करण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाला यानिमित्ताने आली होती असेही ते म्हणाले.  परंतु दुर्दैवाने ती तपासणी झाली नाही आणि निवडणूक आयोगास शिवसेनेच्या प्रकरणात निर्णय घ्या असे सांगण्यात आले. संविधानाने आणि संसदेने निवडणूक आयोगाची जी तटस्थता जपली होती. दुर्दैवाने या निर्णयामुळे ती धोक्यात आल्याचे भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यापुढे पक्षातील विवादावर निवडणूक आयोग निर्णय घेणार हा जो संदेश या निर्णयातून गेला आहे, तो चुकीचा आहे असे मी मानतो. निवडणूक आयोगाला आपण Frankenstein करायला निघालो आहोत का अशी दाट शक्यता निर्माण होते असल्याचा इशारा देत यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करावे अशी विनंतीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला वंचित बहुजन आघाडीच्यावतीने केली.

Check Also

राहुल गांधी यांचा थेट सवाल, मोदीजी घाबरलात का?

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झालेली आहे. त्यातच पुन्हा एकदा भाजपा आणि नरेंद्र मोदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *