Breaking News

उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल, रामलल्ला काय त्यांची खाजगी प्रॉपर्टी आहे का

काही महिन्यांपूर्वी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका झाल्या. या निवडणूकांमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारसभेत बोलत असताना भाजपाची सत्ता आल्यानंतर अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन मोफत घडविणार असल्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावरून शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खोचक सवालही केला.

मीरा भाईंदर येथील गोवर्धन दिनानिमित्त मुंबई उपनगरातील हिंदी भाषिकांकडून आयोजित पुजा समारंभास उपस्थित रहात छोटेखानी मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांना आपण घरातले समजून आपल्या सोबत ठेवले. आणि ज्यांना आपण शस्त्र शिकविले तेच आज आपल्यासमोरील शत्रुशी हात मिळवणी करत आपल्यासमोर शत्रु समजून उभे राहिले. महाभारत कधी घडले माहीत नाही. पण ज्यावेळी घरातली माणसी शत्रु म्हणून समोर आली. त्यावेळी श्रीकृष्णाने अर्जूनाला जे सांगितले त्यालाच आपण भगद्गीता म्हणतो, की शत्रु जेव्हा समोर येतो तेव्हा हातातील धनुष्यबाणाने त्याचा वेध घ्यायचा असतो. भलेही तो कोणत्याही धर्माचा असो. पण शत्रुशी मिळालेल्याने घाबरून आपले धनुष्यबाणही चोरल्याचा खोचक टोला एकनाथ शिंदे यांचे नाव घेता लगावला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, दूध आणि साखर जसे एकमेकांमध्ये मिसळले. तसे मराठी माणसांमध्ये उत्तर भारतीय लोक मिसळून गेले. या दूध साखरेच्या मिसळण्यात काही जण मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मिठांचा खडा टाकणाऱ्यांपासून दूर रहा असा इशाराही भाजपाचे नाव न घेता उत्तर भारतीयांना दिला.

तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मध्य प्रदेशातील निवडणूकीतील प्रचारात बोलताना देशाचे केंद्रीय मंत्री म्हणाले रामलल्लाचे दर्शन मोफत घडवू. मग बाकिच्यांना काही विकतचे घडविणार का असा सवाल करत रामलल्ला हे काय तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे का की मोफत दर्शन घडवायला. अयोध्येतील राम लल्ला हा सर्वांचा आहे. त्याच्या दर्शनाचा हक्क सर्वांना आहे. त्यामुळे भाजपाकडून आला तर मोफत दर्शन आणि काँग्रेसकडून आला तर घ्या त्याच्याकडून पैसे असे करणार आहेत का असा खोचक सवालही केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, मध्यंतरी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये नेलेल्या उद्योगाच्या उद्घाटनावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल. फक्त गुजरातची का प्रगती, उत्तर प्रदेशात उद्योग झाला तर उत्तर प्रदेश मजबूत होणार नाही, मग देशाची प्रगती होणार नाही. मग महाराष्ट्राची प्रगती होत असताना इथले उद्योग तिकडे का नेले की महाराष्ट्राच्या प्रगतीमुळे देशाची प्रगती होत नाही असा सवालही नरेंद्र मोदी यांना केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *