Breaking News

ट्रॅक्टर रॅली: शरद पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी जबाबदार पंतप्रधान मोदींमुळेच हिंसक वळण

मुंबई : प्रतिनिधी

नवी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनास पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला असून मागील ६१ दिवसांत त्यांची मानसिकता काय झाली हे पहावं लागेल असे सांगत पंतप्रधानांमुळेच त्यांनी आज वेगळा मार्ग निवडला असल्याचा आरोप त्यांनी केला.

देशाच्या प्रजासत्ताक दिनीच दिल्लीत शेतकऱ्यांनी आज हिंसक आंदोलन केल्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हिंसक आंदोलनाचा ठपका पंतप्रधानांवर ठेवला.

६१ दिवस झाले शेतकरी दिल्लीच्या वेशीवर अभूतपूर्व आंदोलन करत आहेत. हे शेतकरी पंजाब, हरयाणाचे आहेत. तीन काळे कायदे रद्द करण्याची मागणी करत असून देश भुकेला असताना ज्या शेतकर्‍यांनी देशाला अन्न पुरवलं ते शेतकरी हे आहेत. थंडी, वा-यात दोन महिने झालं आंदोलन करतोय. पण पंतप्रधानांनी साधी विचारपूस केली नाही. देश हा खरंच प्रजासत्ताक आहे का? असा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत असल्याची खंत त्यांनी यावेळी केली.

जनतेची साधी विचारपूस केली जात नाही. चर्चेने थकून जावं असा खेळ केंद्राकडून खेळला जात असून त्यांचा अंत पाहण्याचा प्रयत्न सरकारने करू नये असा इशाराही त्यांनी दिला.

शांततेत आंदोलन करणारा शेतकरी आज वेगळ्या मार्गाने गेला. मात्र शेतकऱ्यांनीही त्या मार्गाने जाऊ नये असे आवाहन करत हा गांधींचा देश आहे असल्याचे त्यांनी नमूद केले.

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणं, गुंड म्हणणं या पातळीवर भाजप गेलेले आहेत. ६१ दिवसात त्यांची मानसिकता काय झाली असेल ते बघायला हवं. या आंदोलनास हिंसक वळण लागण्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरेकर यांची विधानं बघून मला माझं वाईट वाटतं असल्याची खंत व्यक्त करत ते म्हणाले की, मी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होता. शेतकरी एवढ्या कष्टाने आंदोलनात सहभागी झाले त्यांच्याबद्दल असं विधान दुर्दैवी करण चुकीचे असून मी ज्या पदावर बसलो होतो त्या पदावरील व्यक्तीने असे विधान करणे दुर्देवी आहे. मला कमी पणा वाटतो मी त्या पदावर बसलो होतो अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *