Breaking News

“या” जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणूका जाहिर; अर्ज मात्र ऑनलाईन राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाचा आदेश जारी

ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिकांसह ग्रामपंचायतीच्या निवडणूका स्थगित ठेवण्यात आल्या होत्या. तसेच ओबीसी आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याशिवाय या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्यायच्या नसल्याचेही तत्कालीन महाविकास आघाडीने जाहिर केले होते. मात्र राज्यात सत्तांतर होताच ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगर पंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहिर करण्यात आला असून तसे आदेशही जारी करण्यात आले आहेत. मात्र यावेळी पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार आहे.

नगर परिषदा आणि नगर पंचायचतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम घेण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगांव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित तसे आदेश दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० अशी निश्चित करण्यात आली आहे.

या सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २० जुलै रोजी निवडणूकीची अधिसूचना जारी करायची आहे. २२ ते २८ जुलै पर्यत ऑनलाईन पध्दतीने निवडणूक उमेदवारी सकाळी ११ ते वाजल्यापासून २८ जुलै पर्यत दुपारी २ वाजेपर्यत अर्ज भरता येणार आहे. रविवार आणि शनिवारी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. याशिवाय २९ जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होवून त्याची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर ४ ऑगस्ट पर्यत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत असणार आहे. तसेच एखाद्या अर्जा विरोधात तक्रार असेल किंवा अपील असेल तर त्यावरील सुनावनी ८ ऑगस्टला घेण्यात येईल. तर १८ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात यावे आणि १९ ऑगस्टला मतमोजणी आणि निकाल जाहिर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेले टाईम टेबल खालीलप्रमाणे:-

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *