Breaking News

उध्दव ठाकरेंच्या त्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, पक्षातील पदांसाठी मतदानच घेतले नाही शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्लीतून उत्तर

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रश्नी सध्या सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी प्रलंबित आहे. तसेच शिवसेना आणि पक्षचिन्ह कोणाला मिळणार याची उत्सुकता राज्यातील जनतेत निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यघटनेतील तरतूदीनुसार शिवसेना पक्षाची घटना आणि पदांची निर्मिती करण्यात आली. देशात लोकशाही आहे, असं आपण मानतो, तर पक्षांतर्गत सुद्धा लोकशाही आहे. पक्ष फक्त दोनच पातळीवर असतो. एक विधिमंडळ आणि दुसरं संसदीय आणि त्यापलीकडे मोठा पक्ष रस्त्यावर असतो. जो पक्ष आपला नेता, आपली घटना पाळतो, जी घटना शिवसेनेला, त्यानुसार निवडणुका होतात, असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी करत शिंदे गटावर निशाणा साधला. उध्दव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले, पण, उद्धव ठाकरेंचं हे विधान दिशाभूल करणार असून पक्षात च्या घटनेतील पदाकरीता मतदान घेतले नाही असा आरोप करत प्रत्युत्तर दिले.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी दिल्लीत प्रसारमाध्यांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी सहानभुती मिळवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेच्या घटनेसंदर्भात उद्धव ठाकरेंनी दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. २०१३ आणि २०१८ साली शिवसेनेच्या घटनेत दुरूस्ती करण्यात आली, त्यात शिवसेना प्रमुख पद अबाधित ठेवण्यात आलं. पक्षप्रमुख हे नवीन पद निर्माण केल्याचा दावा केला.

पुढे बोलताना शिंदे गटाचे खा राहुल शेवाळे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी १९९८ साली निवडणूक आयोगाला हमी दिली होती, की पक्षात लोकशाही पद्धत राबवण्यात येईल. पण, २०१३ आणि २०१८ साली झालेल्या पक्षाच्या निवडणुकीत लोकशाही पद्धत राबवण्यात आली नाही. उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाबद्दल कोणताही आक्षेप नाही. मात्र, शिवसेना नेते, उपनेते, विभागप्रमुख, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख पदांसाठी कोणतेही मतदान पार पडलं नाही. मुंबईतील गटप्रमुखांनी कधीही मतदान केलं नाही, असा आरोपही केला.

१६ आमदारांच्या अपात्रेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत आयोगाने निर्णय देऊ नये, असं उद्धव ठाकरेंच्या विधानावर बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप बाकी आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा असून, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यांना हा निर्णय माहिती नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असा उपरोधिक टोलाही राहुल शेवाळेंनी उध्दव ठाकरेंना लगावला.

Check Also

इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने घेतली लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाची माहिती

इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *