Breaking News

जितेंद्र आव्हाडांचा आरोप, माझ्या प्रकरणात तो नियमच पाळला गेला नाही…

हर हर महादेव मराठी चित्रपटात शिवरायांचा चुकीचा इतिहास दाखविल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील व्हिव्हिएना मॉलमधील या चित्रपटाचा शो बंद पाडला. त्यानंतर एका प्रेक्षकाला मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक करण्यात आली. मात्र आज त्यांना जामीन मिळाला. सुटका झाल्यानंतर आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत यासंपूर्ण प्रकरणामागे एक चाणक्य होता असे सूचक वक्तव्य करत माझ्यावर करण्यात आलेल्या कारवाईत तो नियमच पाळण्यात आला नाही असा गंभीर आरोप करत पोलिस हतबल होते असे सांगितले.

विशेष म्हणजे हर हर महादेव या चित्रपटातील नेमक्या कोणत्या संदर्भ प्रसंगावर आक्षेप होता त्याची माहितीही जितेंद्र आव्हाड यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत दिली.

आपल्याला किमान एक दिवस तरी तुरुंगात टाकायला पाहिजे, यासाठी षडयंत्र रचलं होतं. त्यासाठी विशिष्ट कलमं लावण्यात आली होती असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला.

मला अटक करणारे वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विनयकुमार राठोड यांचा या प्रकरणाशी शून्य संबंध आहे. पहिल्यांदाच एक बाब स्पष्ट करू इच्छितो की, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विनयकुमार राठोड यांचा माझ्या अटकेशी शून्य संबंध आहे. त्यांची हतबलत दर मिनिटाला समजत होती. त्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू येणं बाकी होतं. बाकी सगळे पोलीस अधिकारी हतबल झाले होते. कारण असं अचानक कुणी कुणाला ताब्यात घेत नाही, असेही ते म्हणाले.

मला कलम ४१ (अ) अन्वये जी नोटीस देण्यात आली होती, ती नोटीस मला दुपारी दोन वाजता देण्यात आली होती. त्यामध्ये तुम्ही पाच वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहा, असं सांगण्यात आलं होतं. पण त्याआधीच म्हणजे अडीच वाजताच मला अटक करण्यात आली. नोटीस दिल्यानंतर ७२ तासांच्या आत कुणालाही अटक करता येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा नियम आहे. मात्र, माझ्या प्रकरणात हा नियम पाळला नाही, असा आरोपही त्यांनी केला.

माझ्यासह एकूण १२ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पण केवळ मला जारी केलेल्या नोटीशीवर ‘क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट- १९३२’ च्या सेक्शन ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. बाकी ११ जणांवर हे कलम लावण्यात आलं नाही. मला एखादा दिवस तुरुंगात ठेवायचं असेल तर कोणतं कलम लावावं? असा विचार करून हे कलम टाकण्यात आलं होतं. यांना तक्रारदार मिळत नव्हता, त्यामुळे त्यांनी विवियाना मॉलचे व्यवस्थापक आणि सिनेपोलीसच्या कर्मचाऱ्यांवर जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *