Breaking News

केंद्रीय मंत्री अमित शाहनी नाव घेताच गुजरात एसटीएसची तात्काळ करवाई तीस्ता सेटलवाड यांना घेतलं ताब्यात

गुजरात दंगलप्रकरणी नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल देत तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावत नरेंद्र मोदी यांची निर्दोष असल्याचा निकाल दिला. मात्र या निकालावर एका खाजगी दूरचित्रवाणीशी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांचे नाव घेतले. त्यांनंतर गुजरात एसटीएने नाव घेणे हाच आदेश समजून सेटलवाड यांना मुंबईत लगेच ताब्यात घेतले.

गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदी आणि इतरांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) दिलेल्या क्लिनचीटचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ठेवला. हा निकाल देताना न्यायालयाने झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यानंतर आता गुजरात एटीएस अॅक्शन मोडमध्ये आली असून सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना एटीएसने ताब्यात घेतलं आहे. त्यांना सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

२००२ सालाच्या गुजरात दंगलीमध्ये काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांचा मृत्यू झाला झाला होता. त्यानंतर एहसान जफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी एसआयटीने मोदी यांना दिलेल्या क्लीन चिटविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. झाकिया जाफरी यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मोदी तसेच इतरांवरील आरोप फेटाळून लावत एसआयटीचा अहवाल कायम ठेवला. त्यानंतर एखा खाजगी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दंगलीचे आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. तसेच या मुलाखतीदरम्यान, त्यांनी तिस्ता सेटलवाड यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यानंतर आता एटीएसने सेटलवाड यांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना सध्या सांताक्रूझ येतील पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

गुजरात दंगलीमध्ये काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांचा मृत्यू झाला झाला होता. त्यानंतर एहसान जफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी एसआयटीने मोदी यांना दिलेल्या क्लीन चिटविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *