Breaking News

सुप्रिया सुळेंचे आश्वासन, श्रमिक कामगारांच्या वेतन विधेयकासाठी पाठपुरावा करणार श्रमिक घर कामगार संघटनेचे उद्घाटनप्रसंगी सुप्रिया सुळेचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी

असंघटित कामगारांच्या हितासाठी गठित झालेल्या श्रमिक घर कामगार संघटनेचे उद्घाटन झुमच्या माध्यमातून करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आश्वासन दिले की, कामगारांना किमान वेतनाच्या रखडलेल्या विधेयकासाठी पाठपुरावा करणार आणि कामगार वर्गास न्याय मिळवून देणार.

महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी कामगार वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी आग्रही आहे आणि मोठ्या विश्वासानी पवार साहेबांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर कामगार विभागाची जबाबदारी सोपविली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली असून कामगारांसाठी काही वेगळे करण्याचे ठरले होते. पण दुदैवाने कोरोनाचे संकट आले आणि धोरण बनविण्याचे काम थांबले. पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांनी मांडलेल्या विधेयकासाठी दिल्लीत सर्वोपरी पाठपुरावा करीन. यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सद्यस्थितीत शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती दिली आणि या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्याकडून कामगार हिताचं दाखल झालेले विधेयक मंजूरीची अपेक्षा व्यक्त केली. कामाचे तास आणि वार्षिक वेतन निश्चिती सोबत घरगुती कामगारांना दारिद्र्य रेषेखाली समाविष्ट करण्याची गरज आहे.

संस्थेचे संस्थापक आणि सल्लागार अॅड कैलास आगवणे यांनी संघटना स्थापना आणि उद्दिष्टे यावर प्रकाश टाकला तर राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष डॉ सुरेना मल्होत्रा यांनी वैद्यकीय सेवेची हमी दिली.

या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे चांदीवली तालुका अध्यक्ष बाबू बत्तेली, छाया मयेकर, अध्यक्ष इंदुमती जमदाडे, उपाध्यक्ष दीपाली सपकाळ, सरचिटणीस सुलभा राय, खजिनदार सपना माने, राधा जानविलकर, सारिका निंबाळकर, सुषमा धवाडे, रुपाली गायकवाड उपस्थित होते.

Check Also

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ‘शपथनामा’ जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला ‘शपथनामा’ असे नाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *