Breaking News

आणि मंत्री देशमुखांचे आव्हान राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी स्विकारले नाही तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती स्विकारण्याची दोन्ही नेत्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

सोलापूर शहरात महापालिकेच्या जागेवर माझे घर असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी केला. मात्र मी सर्वसामान्य घरातून आलेला माणूस आहे. माझ्या कामातून मी सर्व कारखाने उभे केले. तुम्ही सत्तेत होतात. मी नव्हतो. त्यामुळे मी सरकारी योजनेतला एकही पैसा न घेता सर्व उद्योग उभा केलाय. तुम्ही दाखवून द्यावे कि सरकारी पैसा न घेता तुम्ही उद्योग उभा केल्याचे असे आव्हान देत यातील एक जरी पुरावा सादर केलात तर मी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेवून असे आव्हान राज्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांना दिले.

विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवड्यावरील पणन विभागाच्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी जयंत पाटील यांना आव्हान दिले.

या आव्हानाची तातडीने दखल घेत जयंत पाटील म्हणाले की, मी तुमचे आव्हान स्विकारत असल्याचे सांगत मी फक्त तुमच्या घराच्या अतिक्रमणाबद्दल बोलल्याची आठवण करून देत आम्हा दोघांच्याही उद्योगाची चौकशी करावी आणि कुणी सरकारी पैसा घेवून उद्योगांची उभारणी केली हे सत्य बाहेर येवू द्या अशी मागणीच त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

तसेच पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी मेरिटवर उत्तर द्यावे असा खोचक सल्ला देत उगीच भावनिक भाषण करून आव आणू नये अशी सूचनाही केली.

 

 

Check Also

दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचाऱ्यांना नायब राज्यपालांकडून नारळ

दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचाऱ्यांना नायब राज्यपाल व्ही. सक्सेना यांनी २ मे रोजी दिल्ली महिला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *