Breaking News

Tag Archives: co-operative minister subhash deshamukh

अध्यक्ष बागडेंच्या निर्णयामुळे सरकारची नाचक्की तर विरोधकांचा विजय विरोधकांच्या मागणीनुसार उर्वरित उत्तर प्रश्नोत्तराच्या तासानंतर

मुंबई : प्रतिनिधी पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मांडलेल्या २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. मात्र विशेष बैठकीची वेळ संपत आल्याने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंत्री देशमुख आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वेळ वाढविण्याच्या मागणीला केराची टोपली दाखवित विरोधकांच्या मागणीनुसार निर्णय घेत …

Read More »

मुंबई बाजार समितीला राष्ट्रीय बाजार आवार म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरु आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील महत्वाची बाजारपेठ असून मुंबई बाजार समिती ही राष्ट्रीय बाजार आवार म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या बाजार समितीच्या आवारात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिले. व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत आज पणनमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी आमदार …

Read More »

कर्जमाफी योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी आता २० मे पर्यंतची मुदत वन टाईम सेटलमेंटसाठी ३० जून पर्यंतची मुदतवाढ

मुंबई : प्रतिनिधी छत्रपती  शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ज्या शेतकऱ्यांना काही कारणाने अर्ज करता आले नाहीत, त्यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता आणखी वाढवून २० मे २०१८ अशी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे. १ मे ऐवजी आता २० मेपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. वन टाइम सेटलमेंट …

Read More »

महापालिका आणि पोलिसांच्या विरोधात शेतकऱ्यांचे मंत्रालयाच्या दारात आंदोलन मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर उस्मानाबादच्या शेतकऱ्यांचे भाजी फेको आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी शेतीमालाला चांगली बाजार पेठ मिळावी आणि किंमत मिळावी या उद्देशाने उस्मानाबादहून मुंबईत येवून भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि मुंबई पोलिसांनी अटकाव केला. त्यामुळे या संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर टेम्पोतून भाजी आणून भाजी फेको आंदोलन केले. यामुळे मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. सदर शेतकरी …

Read More »

तूर साठवणुकीसाठी खासगी गोदाम ताब्यात घेणार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी तूर खरेदी गोदामाअभावी अडू नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीतील गोदामासह जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खासगी गोदाम ताब्यात घेण्याचे निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आज दिले. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. तूर खरेदीचा आढावा आज सहकारमंत्र्यांच्या दालनात घेण्यात आला. यावेळी राज्यभरात १९१ खरेदी केंद्रावर  ९ एप्रिलपर्यत २१ लक्ष ५० हजार ६४५ क्विंटल तूर …

Read More »

कर्जमाफी योजनेसाठी अर्ज भरण्याची तारीख आता १४ एप्रिलपर्यंत वंचित शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे सहकार मंत्री देशमुखांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ऑनलाईन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत आता १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी  अशा शेतकऱ्यांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले. तसेच मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठीही …

Read More »

आणि मंत्री देशमुखांचे आव्हान राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी स्विकारले नाही तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती स्विकारण्याची दोन्ही नेत्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी सोलापूर शहरात महापालिकेच्या जागेवर माझे घर असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी केला. मात्र मी सर्वसामान्य घरातून आलेला माणूस आहे. माझ्या कामातून मी सर्व कारखाने उभे केले. तुम्ही सत्तेत होतात. मी नव्हतो. त्यामुळे मी सरकारी योजनेतला एकही पैसा न घेता सर्व उद्योग उभा केलाय. तुम्ही दाखवून …

Read More »

तूर खरेदी केंद्र बंद होणार नाहीत आतापर्यंत १२ लाख ७० हजार क्विंटल तूरीची खरेदी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आतापर्यंत १२ लाख ७० हजार क्विंटल तूरीची खरेदी करण्यात आली आहे. हमीभावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करू नये अशा सूचना बाजार समित्यांना देण्यात आल्या आहेत. कुठल्याही प्रकारे खरेदी केंद्र बंद होणार नसल्याची ग्वाही देत खरेदीचे चुकारे दिले जातील, अशी माहीती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज …

Read More »

फलोत्पन निर्यातीतील समस्या सोडविण्यासाठी लवकरचं केंद्रासोबत बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी राज्यात साखरेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. जास्तीचे झालेल्या उत्पादन परदेशात निर्यात करण्यासाठी आणि या उद्योगातील समस्या सोडविण्यासाठी साखर कमिशनची स्थापन करण्यात आली आहे. त्या धर्तीवर द्राक्षे, डाळींब, संत्रा फलोत्पदानातील समस्या सोडविण्यासाठी एखादे कमिशन स्थापन करणार का? असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित …

Read More »

पतसंस्थांची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देणार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील खाजगी पतसंस्थांनी नागरीकांकडून ठेवी स्विकारल्या. मात्र त्यातील अनेक पतसंस्था या आर्थिक डबघाईला आलेल्या आहेत किंवा त्या दिवाळखोरीमुळे बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने अशा बंद पडलेल्या किंवा डबघाईला आलेल्या पतसंस्थाची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री …

Read More »