Breaking News

न्यायालयाने विचारताच राहुल गांधींची स्पष्टोक्ती, मी बोलतो पण… प्रियंका गांधी-वड्रांचा मोदी सरकारवर निशाणा

गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा यात्रेच्या निमित्ताने कोलर येथील प्रसारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे माजी आमदार पुनरेश मोदी यांनी सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवलं असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी न्यायालयात उपस्थित राहिलेल्या राहुल गांधी यांना न्यायालयाने काही म्हणणे असल्याबाबत विचारणा केली असता राहुल गांधींने पुन्हा एकदा आपल्या स्पष्टोक्तीचा प्रत्यय दिला.

मागील आठवड्यात याप्रकरणी सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाच्या सुनावणीवेळी आज राहुल गांधी स्वत: सुरत न्यायालयात हजर होते. यावेळी न्यायालयाने राहुल गांधी यांना काही म्हणणे आहे का अशी विचारणा केली, त्यावर राहुल गांधी म्हणाले, मी नेहमी भ्रष्टाचाराविरोधात बोलतो. मी कोणाच्या विरोधात मुद्दामहून बोललो नाही. यामुळे कोणाला नुकसान झालेले नाही, असे न्यायालयाला सांगितलं. मात्र, न्यायालयाने त्यांना भादंविच्या कलम ५०४ अन्वये दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली तसेच त्यांना जामीनही मंजूर केला.

गुजरातमधील मोदी समाजाने राहुल गांधींवर मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी होत, सुरतमधील सीजेएम न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी ट्वीट करत हल्लाबोल केला आहे. घाबरलेलं सरकार साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण, माझ्या भावाला कधी भीती वाटली नाही आणि वाटणारही नाही. सत्य बोलत जगलो आणि सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू… करोडो देशवासीयांचं प्रेम राहुल गांधींच्या पाठीशी आहे, असं प्रियंका गांधींनी ट्वीट करत म्हटलं.

राहुल गांधी आज न्यायालयात पोहचले होते. तेव्हा न्यायालयाने राहुल गांधींना तुम्हाला काही मत मांडायचं आहे का? असं विचारलं. त्यावर ‘मी सातत्याने भ्रष्टाचाराविरोधात बोललो आहे. कोणाच्या विरोधात जाणूनबुजून बोललो नाही. त्याने कोणाचंही नुकसान झालं नाही,’ असं राहुल गांधींनी सांगितलं. याप्रकरणावर निकाल देताना कलम ५०४ अन्वये न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

Check Also

निर्मला सीतारामन यांची सॅम पित्रोदांच्या वर्णद्वेषी टिप्पणीवरून टीका

आंतरराष्ट्रीय ख्यातकिर्त विचारवंत शास्त्रज्ञ आणि काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी आज एक व्हिडिओ जारी करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *