Breaking News

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा हात सोडलाः राजीनाम्याचे पत्र वाचले का? राहुल गांधी अपरिपक्व नेते असल्याचा आरोप

मागील महिन्यापासून काँग्रेस पक्षांतर्गत नेतृत्वावरून निर्माण झालेल्या प्रश्नावरून उभे तट पडले आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राजीनामा देत समाजवादी पक्षाची वाट धरली. त्यानंतर आज ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

यासंदर्भात आझाद यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहित राहुल गांधी यांच्या अपरिपक्व नेतृत्वामुळे पक्षांतर्गत असलेली व्यवस्था मोडकळीस आणत असल्याच्या निषेधार्थ आपण राजीनामा देत असल्याचे कारण गुलाम नबी आझाद यांनी दिले आहे.

काँग्रेसची परिपक्व नेतृत्वाशिवाय होत असलेली फरफट पाहता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाशैलीच्या विरोधात काँग्रेसच्या २३ जणांनी काँग्रेसतंर्गत करावयाच्या बदलाच्या अनुषंगाने काही सूचना काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना करण्यात आल्या होत्या. मात्र या जी -२३ जणांच्या विरोधात देशभरात नकारात्मक प्रचार करण्यात आला. तसेच यातील नेत्यांवर वैयक्तीक हल्लेही करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पक्षाच्या हिताच्या दृष्टीने सल्ले देणाऱ्या निष्ठावान नेत्यांवर अशा पध्दतीने आरोप करण्यात आल्याने आपण व्यथीत करण्यात आल्याचा मुद्दा आझाद यांनी आपल्या पत्राद्वारे सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणून दिला.

याशिवाय या जी २३ नेत्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांचा दिल्लीत मात्र राहुल गांधी यांच्याकडून सन्मान करत त्यांना पदे देण्यात येत असल्याबाबतचा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला.

माझ्या राजकिय जीवनाची सुरुवात काँग्रेसचे स्व. नेते संजय गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु केली. त्यानंतर स्व.राजीव गांधी यांना माझ्यात युवक अध्यक्ष पदाच्या काळात पदाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. स्व. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यापासून ते पंतप्रधान नरसिह राव आणि मागील ८ वर्षे विरोधी पक्षनेता म् केंद्रीय सरकारमध्ये मंत्री पदे भूषविली. त्याचबरोबर मागील अनेक वर्षापासून मी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम केले. या कालावधीत माझ्याकडून काँग्रेसच्या प्रगतीच्यादृष्टीनेच काम केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

२०१४ सालच्या लोकसभा निवडणूकीच्या आधी माझ्या नेतृत्वाखालील समितीने काँग्रेसच्या आगामी वाटचालीच्या अनुषंगाने काही सूचनांचा प्रस्ताव पक्षाकडे सुपूर्द केला. मात्र त्यातील शिफारसींवर अद्याप कोणाताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यासंदर्भात अनेकवेळा स्मरण पत्रे पाठविण्यात आले. तरीही त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. वास्तविक पाहता राहुल गांधी पक्षिय राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राष्ट्रपतींनी मान्य केलेले विधेयक पत्रकार परिषदेत फाडून टाकले. त्यावेळी राहुल गांधी यांची प्रतिमा देशभरात नकारात्मक पध्दतीची झाली आणि त्यामुळे पक्षाला देशभरात पराभवाला स्विकारावा लागला. लोकसभा निवडणूकी पाठोपाठ राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्येही काँग्रेसला पराभव स्विकारावा लागला असा गंभीर आरोपही त्यांनी पत्रातून केला.

पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बदनामी करणे, त्यांना अपमानकारक वागणूक देणे आदी गोष्टी राहुल गांधी यांच्याकडून वारंवार करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पूर्वी देशातील ९० टक्के राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता होती. आता ही संख्या २ राज्यांपूरती मर्यादीत झाली आहे. तसेच पक्षांतर्गत निवडणूकाही अद्याप झालेल्या नाहीत. दुसऱ्याबाजूला निवडणूका न घेताच आपल्या मर्जीतील व्यक्तींच्या नेमणूका पक्ष संघटनेत करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या सर्व पार्श्वभूमीवर आपणास काँग्रेसमध्ये राहण्याची इच्छा उरलेली नाही. त्यामुळे आपण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी पत्रात नमूद केले.

गुलाम नबी आझाद यांचे हेच ते राजीनामा पत्र

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *