Breaking News

संजय राऊत म्हणाले, बँक घोटाळ्यातील पैसा सोमय्या आणि कंबोजने जमिनीत गुंतविला आता फक्त ट्रेलर उघडकीस पिक्चर अभी बाकी है

मराठी ई-बातम्या टीम

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडायला नकार दिला म्हणून ईडीच्या माध्यमातून माझ्या मित्र आणि माझ्याशी संबधित व्यक्तींवर धाडी टाकण्याचे आणि अटक करण्याचे काम सुरु आहे. ज्या भष्ट्राचाराचे नाव घेवून भाजपाचा तो दलाल-भडवा किरीट सोमय्या हा उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील नेत्यांवर करत आहे. परंतु पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा राकेश वाधवानकडून घेवून निकाँन इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून वसई-विरार येथील जमिनीत गुंतवली असून विरार येथे एका मोठा प्रोजेक्ट राबविला जात असल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंटमॅन हा मोहित कंबोज असून या मोहित कंबोजने पत्रावाला चाळीची १२ हजार कोटींची जमिन अवघ्या १०० कोटी रूपयात खरेदी केली आहे. तसेच हा पैसा पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील असून या कंबोजच्या अनेक कंपन्या असून त्यातील गुंतवणूक किंवा पैसा कोणाकडून आला याची माहिती फडणवीसांनाच असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केली.

शिवसेना भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जवळपास सर्वच नेते, आमदार आणि काही मंत्री हजर होते.

महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही. तुम्ही कितीही नामर्दानगी करून आमच्या पाठीत वार केला तरी शिवसेना घाबरणार नाही असा इशारा देत महाराष्ट्रातील आणि पश्चिम बंगालमधील सरकार पाडण्यासाठी या पध्दतीचा नालायकपणा भाजपाकडून करण्यात येत आहे. परंतु आम्ही झुकणार नसल्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राज्याच्या महाआयटीत २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असून त्याची ५ हजार कोटी रूपयांच्या घोटाळ्यांची कागदपत्रे आपल्याकडे आली आहेत. तसेच या घोटाळ्यातील कोण आहे हा अमोल काळे आणि नरणे यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा कसा आला, यांना या कामाचे कंत्राट कसे मिळाले असा सवाही त्यांनी यावेळी केला.

पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या राकेश वाधवान याच्याकडून वसई येथील ४०० कोटी रूपयांची जमिन किरीट सोमय्या आणि त्याचा मुलगा निल सोमय्या यांच्या मुलाच्या कंपनीने खरेदी केली. तसेच विरार येथील जमिनही अशीच बाजारभावापेक्षा कमी किंमतीला खरेदी करून तेथे मोठा प्रोजेक्ट सुरु आहे. त्या प्रोजेक्टला पर्यावरण मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. परंतु त्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे. पर्यावरण विभागाच्या नियमांचे उल्लंघन झाले असेल सोमय्यांना ३०० कोटींचा दंड भरावा लागेल असेही त्यांनी सांगितले.

राकेश वाधवाच्या खात्यातून अनेकांच्या खात्यावर पैसे गेले. त्यापैकी घोटाळा सुरु असताना वाधवाच्या खात्यातून भाजपाच्या बँक खात्यात २० कोटी रूपये गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

किरीट सोमय्या हे दररोज ईडीच्या कार्यालयात बसून दही आणि खिचडी खात असतात. ते एक दलाल असून ते ज्या पध्दतीने याच्या घरावर धाड पडणार, त्या व्यक्तीच्या घरावर धाड पडणार असे सांगतात आणि त्यानुसार धाडसत्र सुरु होते असा गंभीर आरोप करत हरयाणाचा एक दुधवाला आहे. त्याचे नाव नरवर असून भाजपाची सत्ता असताना पाच वर्षात तो ७ हजार कोटींचा मालक झाला. त्या ७ हजार कोटी रूपयांपैकी ३५०० कोटी रूपये महाराष्ट्रातील भाजपा नेत्याचे असल्याचे सांगत त्या नेत्याचे नाव मी आता सांगणार नाही, परंतु याबद्दलची माहिती नंतर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच पाच जणांच्या टोळीकडून मुंबईतील ६० बिल्डरांकडून ३०० कोटींची वसुली ईडीच्या नावाखाली करण्यात असल्याचा गंभीर आरोप करत या सगळ्या पैशाचे मनीलॉंडरींग झाल्याचे सांगत याची माहिती ईडीच्या काही अधिकाऱ्यांना आहे. त्याची माहितीही माझ्याकडे असून ईडीला वाटले तर माझ्या घरी ते येवू शकतात असे आवाहनही त्यांनी केले.

यासगळ्या गोष्टींची माहिती सर्वाध आधी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून देणार असल्याचे सांगत तीन वेळा मी किरीट सोमय्या यांच्या घोटाळ्याची माहिती ईडीकडे तीन वेळा पाठविली. परंतु त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नसल्याचे सांगितले. मात्र या घोटाळ्याची कागदपत्रे आता ईओडब्लू आणि ईडीकडे पाठविणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *