Breaking News

संजय राऊतांचा सोमय्यांवर नवा आरोप, “या” नेत्यांच्या नावावर केली ७ हजार कोटींची वसुली देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहंच्या नावावर वसुली केली

मराठी ई-बातम्या टीम

यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर नवा आरोप करत खळबळ माजविली असून सोमय्या यांनी चक्क माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर ३०० ते ४०० कोटी रूपयांची वसुली तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावावरही वसुली केल्याचा आरोप करत यासंदर्भातील ट्रकभर कागदपत्रे माझ्याकडे आल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी आज केला.

कालपासून लोकांनी माझ्याकडे एक एक प्रकरण आणायला सुरुवात केली. आज सोमय्याविरुद्ध माझ्याकडे २११ प्रकरणे जमा झाली आहेत. सोमय्यानी वसुली करून जवळपास साडे सात हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नावाने ही वसुली केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पवईतील पेरू बाग येथील ३८ एकर जमिनीवर ४३३ बोगस लोकं घुसविली. या लोकांना घरे मिळवून देतो म्हणत सदरच्या जमिनीवर पुर्नवसन प्रकल्प राबविण्याच्या बोगस प्रस्तावावर फडणवीस यांची सही घेवून तो प्रकल्प मंजूर करून घेतला. या ४३३ लोकांना त्या जमिनीवर घुसविण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे गोळा करण्यासाठी सोमय्याचे दोन एजंट काम करत होते. त्यांच्या मार्फत त्या ४३३ लोकांकडून फडणवीसांना पैसे द्यायचे म्हणून वेगवेगळ्या रकमा सोमय्याने घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नावावर किरीट सोमय्या यांनी खोट्या स्वाक्षऱ्या करून कोट्यवधी रुपये लोकांकडून वसूल केले, हा एवढा मोठा घोटाळा आहे की आम्हालाही मोजायला अवघड जात आहे. किरीट सोमय्या आणि भाजपाच्या लोकांनी दोन एजंट लावले. कुणाकडून ५० लाखही घेतले. कुठे गेले हे पैसे? तो पैसा गोळा करत होता. फडणवीसांना ५० कोटी देणार असे याने लोकांना सांगितले. फडणवीसांच्या नावे ही वसुली केली. त्यावर मंत्र्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्या. मी सांगतो जवळपास ३०० कोटी रुपयांची वसुली फडणवीसांच्या नावे केली. या सगळ्या घोटाळ्याची कागदपत्र मी आजच इओडब्लू ऑफिसमध्ये देणार असून आजच मुख्यमंत्र्यांना भेटून हा सगळा गैरव्यवहार उघडा पाडणार असून लोकांची काय लूट सुरु आहे, ते दाखवेन असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सोमय्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नावाने वसुली केलीच. तसेच अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या नावानेही वसुली केली. अमित शहांच्या नावावरही सोमय्यानं पैसे गोळा केले. मी आता एक एक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *