Breaking News

युतीची चर्चा गेली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करता ते बोला !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे भाजपला आव्हान

बीड-जालना: प्रतिनिधी

नवीन वर्ष सुरू होऊन ८-१० दिवस झालेत नवं वर्षात अच्छे दिनच नाही तर अच्छी वर्षही येऊ द्या अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे. कोरड्या भाषणांनी आणि कोरड्या घोषणांनी हंडे भरत नाहीत. त्यामुळे या गंभीर दुष्काळाच्या परिस्थितीत माझ्या शेतकऱ्यांचे काय करता ते आधी सांगा असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सरकारला करत युतीची चर्चा गेली खड्यात असा इशाराही दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर असून येथे आयोजित सभेत त्यांनी वरील इशारा दिला.

स्वस्तामध्ये घर देईन नुसतं असं बोलून घर मिळतं का? सरकारी यंत्रणेचा सुस्त अजगराला ढोसकण्यासाठी मी फिरतोय. मी पुन्हा मराठवाड्यात येणार आहे, ही माझी शेवटची भेट नाही

केंद्रीय पथक येऊन गेलं, तुमच्या हातात काही मदत पडली का? असा सवाल करत मग ते लेझिम पथक होतं का बँजो पथक होत अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

दुष्काळ पडल्यानंतरही दुष्काळ दिसायलाही यांना यंत्रणा लागते. सरकारी यंत्रणेचा सुस्त अजगराला ढोसण्यासाठी मी फिरतोय. केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक काही कामाचे नाही, नुसतेच गाजर दाखविण्याचे काम आहे. घोषणांचा बुडबुडा आहे, युतीच्या चर्चेआधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा असे आवाहन करत घोषणांचा बुडबुडा असून रोज वेगवेगळ्या देशात जाता आणि म्हणता देश बदल रहा है अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली.

तुमचे दिवस राहिलेत तरी किती? युतीची चर्चा गेली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करता ते बोला असा सवाल विचारत खरं बोलून एकही मत मिळालं नाही तरी चालेल पण खोटं बोलून मिळालेली मते नकोत असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते. मी ‘मनकी बात’ नाही, ‘जनकी बात’ करतो. पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झालाय ना तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकलात ना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा सोडवू शकलात. जर निर्णय न्यायालय देणार असेल तर मग तुम्ही जाहिरनाम्यात राम मंदिराचे वचन का दिलेत ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *