Breaking News

राज्यघटनेच्या बचावासाठी सर्व समविचारी पक्ष एकत्रितपणे लढा देवू शरद पवार, शरद यादव, अशोक चव्हाण, कॉ.सीताराम येचुरी, हार्दीक पटेल यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी

संपूर्ण देशात संसद असेल, न्यायव्यवस्था असेल यासह सर्वच ठिकाणी भाजपकडून मनमानेल त्या पध्दतीने कारभार सुरु आहे. त्यातच भाजपचाच एक मंत्री संविधान बदलण्याचा अजेंडा भाजपचा असल्याचे जाहीरपणे बोलत आहे. त्यामुळे पुरोगामी विचाराचे समविचारी पक्ष एकत्रित येवून संविधानाला वाचविण्यासाठी एकत्रित येवून आपला लढा देणार असल्याची ग्वाही भाजप आणि शिवसेना वगळता सर्व पक्षिय संविधान बचाव रँलीसाठी एकत्र आलेल्या शरद पवार, अशोक चव्हाण, शरद यादव, कॉ.सीताराम येचुरी, हार्दीक पटेल, ओमर अब्दुला, राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

तसेच आजच्या रँलीनंतर लवकरच दिल्लीमध्ये एक बैठक घेवून पुढील लढ्याची रणनीती ठरविण्यात येणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

या संविधान बचाव रँलीत सहभागी होण्यासाठी जनता दल (यु)चे अध्यक्ष शरद यादव, राष्ट्रवादीचे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, डि.पी. त्रिपाठी, प्रफुल्ल पटेल, कॉंग्रेसचे अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे, भाई जगताप, नाना पटोले, नँशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुला, गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल, माकपचे कॉ.सीताराम येचुरी, भाकपचे डी.राजा, भाजपचे बंडखोर नेते राम जेठमलानी, समाजवादी पार्टीचे अबु आझमी आणि या सर्व रँलीसाठी पुढाकार घेणारे राजू शेट्टी आदी कॉंग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मंत्रालयासमोरील शासकिय निवासस्थानी एकत्रित आले.

त्यानंतर या सर्व नेत्यांनी मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान रँलीस सुरुवात केली. विशेष म्हणजे हे सर्व नेते एकमेंकाच्या हातात हात घालून सर्वात पुढे चालत होते. ही रँली पुढे कुलाबा येथील रिगल थिएटर समोरून गेट ऑफ इंडियाजवळ पोहोचली.

या रँलीत नेत्यांबरोबर सर्वच पक्षाचे कार्यकर्त्येही हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे सुट्टीचा दिवस असूनही हा परिसर मोठा गजबजून गेला होता.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *