Breaking News

जलील यांच्या आंदोलनावर संजय शिरसाटांची मागणी, औरंगजेबाची ती कबरच हटवा… एमआयएमचे आंदोलन म्हणजे बिर्याणी पार्टी असल्याचा आरोप

नुकतेच केंद्र सरकारने औरंगाबादच्या नामांतरास छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्र सरकारची काहीही हरकत नसल्याचे पत्र राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठविले. त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून या संदर्भात अधिसूचना काढून नामांतराची प्रक्रिया सुरु केली. या नामांतराच्या निषेधार्थ ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण करण्यात येत आहे. तसेच औरंगाबादच्या नामांतरास विरोध असल्याचे जाहिर केले. यापार्श्वभूमीवर जलील यांच्या आंदोलनाविरोधात भाजपा- शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी औरंगजेबाची कबर हटवा अशी मागणी करत जलील यांचे आंदोलन म्हणजे बिर्याणी पार्टी असल्याची टीकाही केली.

तसेच औरंगाबाद शहराचा आणि औरंगजेब यांचा काहीही संबध नसल्याचा मतही संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.
संजय शिरसाट पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, इम्तियाज जलील यांचं आंदोलन नाही तर बिर्याणी पार्टी आहे. त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. मुळात त्यांचे आंदोलन म्हणजे भंकसगिरी आहे. त्यांना केवळ राजकारण करायचं आहे. औरंगाबाद आणि औरंगजेबचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

हा वाद नेमका कशामुळे होतो आहे? तर औरंगजेबाच्या कबरीमुळे त्यामुळे त्याची कबर इथून काढा ही आमच्या सहकाऱ्यांची मागणी रास्त आहे. मी सुद्धा याप्रकरणी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून ही कबर इथून काढा, अशी मागणी करणार असल्याचे सांगत औरंगजेब आणि या शहराचा काहीही संबंध नव्हता. औरंगजेब येथे येऊन गेला असेल, पण त्याचा मृत्यू इथे झाला नाही. त्यामुळे त्याची कबर हटवलीच पाहिजे, अशी मागणीही केली.

इम्तियाज जलील आणि त्यांचे सहकारी या शहराचं वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत. बिर्याणी खाऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. हे त्यांचे कोणतं उपोषण आहे? मी याबाबत पोलीस आयुक्तांना भेटणार आहे. आमच्या लोकांवर जो अत्याचार झाला आहे. त्यातून मुक्ती देण्याचं काम आम्ही करतोय आणि त्यात अशाप्रकारे कोणी निझाम येऊन आमच्यावर दादागिरी करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही, असा इशाराही संजय शिरसाट यांनी दिला.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *