Breaking News

माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला हिंदू रेट ऑफ ग्रोथ बाबत धोकादायक इशारा हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणजे काय रे भाऊ?

२०१४ सालापासून एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी काही हिंदूत्ववादी संघटनांकडून जाणीवपूर्वक काही गोष्टी करण्यात येत आहेत. त्यामुळे देश सरळसरळ दोन धर्मांमध्ये विभागल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर तथा अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी हिंदू रेट ऑफ ग्रोथमुळे खाजगी क्षेत्रातील कमकुवत गुंतवणूक, उच्च व्याजदर, मंदावलेला आर्थिक विकास दर यामुळे भारत देश आता खऱ्या अर्थाने हिंदू विकास दराच्या जवळ आला असल्याचा धोकादायक इशारा देत देशातील अर्थव्यवस्था कुठल्या टप्पावर येऊन ठेपली आहे याचे अप्रत्यक्ष विश्लेषण केले. मात्र हिंदू रेट ऑफ ग्रोथ नेमके काय आहे याची चर्चा देशभरात सुरु झाली आहे.
यावेळी बोलताना रघुराम राजन यांनी हिंदू रेट ऑफ ग्रोथ हा शब्द नेमका कधी वापरास सुरुवात झाली आणि याचा योग्य अर्थ काय याचे विश्लेषण खालीलप्रमाणे..

हिंदू रेट ऑफ ग्रोथ अर्थशास्त्रातील एक थिअरी आहे. याचा संबंध कुठल्याही धर्माशी जोडलेला नाही. मात्र आर्थिक मंचांवर या शब्दाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. १९४७ मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर बहुतांश नागरिक हे शेती व्यवसायावर अवबंलून होते. समाजात तेव्हा बरीच गरीबी होती. पायाभूत सुविधा म्हणजे फक्त रेल्वे होत्या. रस्त्यांचा अभाव होता.

मात्र पुढे घडलं असं की हळूहळू या सगळ्या गोष्टींची निर्मिती सुरू झाली. त्यानंतर स्वातंत्र्याला ३० वर्षे पूर्ण होईपर्यंत हा ग्रोथ रेट बराच कमी झाला होता. या मंद गतीने विकास करणाऱ्या विकास दराविषयी बोलताना १९७८ मध्ये हिंदू रेट ऑफ ग्रोथ हा उल्लेख झाला होता. हा उल्लेख त्यावेळी प्रसिद्ध असलेले प्राध्यापक राज कृष्ण यांनी हे नाव घेतलं होतं. राज कृष्ण यांनी १९७८ मध्ये हे नाव घेतल्यानंतर अर्थशास्त्रज्ञ हे नाव घेऊ लागले. १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळी आपला देश आर्थिकदृष्ट्या मागासलेला होता. विकास दर हा ३० वर्षे तसाच होता. हा विकास दर ३.५ टक्के किंवा त्यापेक्षाही खाली होता. त्यामुळे हिंदू वाढीचा दर असा शब्द प्रचलित झाला.

१९९१ मध्ये आर्थिक सुधारणा आणि उदारीकरणाच्या सुरुवातीनंतर ‘हिंदू वाढीचा दर’ मंद गती सोडून देशाचा विकास दर झपाट्याने वाढला. विशेषतः २००३ ते २००८ या काळात देशाचा विकास दर सरासरी ९ टक्के इतका होता.

Check Also

भारताकडील परकीय गंगाजळीत पुन्हा वाढ $६४८.५६२ अब्जवर पोहोचला जानेवारी ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच वाढली गंगाजळी

मागील काही महिन्यापासून भारतीय तिजोरीतील परकीय चलनसाठ्यात सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *