Breaking News

राहुल गांधी यांचा सवाल, आम्ही जातीय जनगणना करत रोजगार…

मागील काही दिवसांपासून देशातील जातीय जनगणना करण्याला भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून जो काही विरोध केला जात आहे. त्या विरोधाला काहीही अर्थ नाही. काँग्रेस आणि इंडिया आघाडी सत्तेवर आल्यानंतर जो जातीय जनगणना करणार असल्याचा निर्धार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहिर सभेत बोलताना व्यक्त केला.

काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित है तयार हम या जाहिर सभेचे आयोजन नागपूरात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून सातत्याने प्रचार करण्यात येतो की काँग्रेसने स्वातंत्र्यलढा फक्त त्यावेळच्या राजे-महाराजांसाठी लढला असल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हांच्या राजे-महाराजे यांनी फक्त ब्रिटीशांशी युती केली. त्यांच्या स्वतःसाठी. परंतु काँग्रेसने ब्रिटीशांना हाकलून लावण्यासाठी जो स्वातंत्र्यलढा उभारला तो सर्वसामान्य लोकांसाठी होता असे सांगत या सर्वसामान्य जनतेसाठीच देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी शैक्षणिक संस्था आणि आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी संस्था सुरु केल्याचे सांगितले.

पुढे बोलताना राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीवर निशाणा साधताना म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाले ते फक्त काही नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर मिळाल्याचा प्रचार करण्यात येत आहे. तसेच काही लोक मोदी पंतप्रधान बनल्यानंतरच देशाचा विकास झाल्याचे सांगत आहेत. मात्र मागील ६०-७० वर्षात देशाचा जो काही विकास झाला तो येथील तरूणांमुळेच झाला. देशातील तंत्रज्ञानातील शोध, विविध विज्ञानातील शोध, संगणकाचा विकास हे येथील तरूणांनीच केले, असे असतानाही जाणीवपूर्वक काही जण मोदी आल्यानंतरच विकास झाल्याचे खोटा प्रचार करत आहेत. काँग्रेसच्या काळात काहीच विकास झाला नाही का असा सवालही उपस्थित केला.

तसेच राहुल गांधी म्हणाले, आम्ही न्याय योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत आर्थिक मागास असलेल्या लोकांच्या बँक खात्यात दरमहा ७ हजार रूपये देणार आहोत. कारण काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून देशातील बेरोजगारी आणि सर्वसामान्य जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी ही योजना राबविणार असल्याची गॅरंटीही देत असल्याचे सांगितले.

राहुल गांधी यावेळी म्हणाले की, केंद्रात सत्ता आल्यापासून नरेंद्र मोदी यांनी सर्व सरकारी यंत्रणांवर कब्जा केला आहे यातून मीडिया, निवडणूक आयोग, न्यायालयेही सुटली नाहीत. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, पण १० वर्षात मोदींनी किती लोकांना रोजगार दिला? देशात आज ४० वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आहे. नोकरी नसल्याने कोट्यवधी तरुणांची शक्ती वाया जात आहे. शेतकरी, तरुण संकटात आहे तर दुसरीकडे देशातील दोन-चार उद्योगपतींकडे देशातील सर्व संपत्ती सोपवली जात आहे. ओबीसी, दलित, मागासवर्गीयांना सत्तेत, प्रशासनात अत्यंत कमी वाटा मिळत आहे. सर्वच क्षेत्रात या समाज घटकांना कमी स्थान दिले जाते. काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली त्यानंतर मोदींची भाषा बदलली व देशात गरिब ही एकच जात आहे असे ते बोलत आहेत. देशातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जावे लागणार आहे, हीच काँग्रेसची विचारधारा आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करेल व देशातील तरुणांना रोजगाराची आवश्यकता आहे ते मोदी सरकार देऊ शकत नाही ते काम काँग्रेस पक्षच करेल. आपल्या मदतीने महाराष्ट्रात व देशात परिवर्तन आणू असा विश्वासही व्यक्त केला.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *