Breaking News

प्रकाश आंबेडकर यांचा भाजपा आणि काँग्रेसवर निशाणा

आपल्या मुस्लिम बंधू-भगिनींविषयी त्यांनी केलेले द्वेषपूर्ण भाषण आणि जातीय आधारावर मतदान करण्याचे आवाहन त्यांच्या जिंकण्याच्या उदासीनतेबद्दल बरेच काही सांगून जाते. यामुळेच वंचित बहुजन आघाडीने त्यांना द्वेषपूर्ण, जातीयवादी आणि मौत का सौदागर असे नाव का दिले आहे हे सिद्ध होत असल्याची टीका नरेंद्र मोदी यांच्यावर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली.

प्रकाश आंबेडकर पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, काँग्रेस आपल्या जुन्या विधानाची सत्यता तपासण्यात व्यस्त आहे, पण मोदींच्या इस्लामोफोबिक आणि द्वेषपूर्ण भाषणावर गप्प आहे! का? ते भारतीय मुस्लिम बांधवांच्या पाठीमागे उभे राहण्यास घाबरतात का? असा सवाल करत तरीही आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो!? असा उपरोधिक टोला लगावला.

या मुद्यांवर वंचित बहुजन आघाडीने लक्ष वेधले

-काँग्रेसने अकोल्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य इस्लामोफोबिक उमेदवार यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवाराच्या वडिलांनी बाबरी मशीद पाडण्यासाठी कारसेवक पाठवले होते. तसेच, उमेदवाराने स्वत: अनेक मुस्लिमविरोधी, आरएसएस समर्थक पोस्ट टाकल्या आहेत.

-महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला एकही मुस्लिम उमेदवार देणे जमले नाही, यात ते अपयशी ठरले आहे.

-काँग्रेसचे मौन आरएसएस-भाजपाच्या भीतीच्या राजकारणाला प्रोत्साहन देत असून, त्यांच्या मौनामुळे मुस्लिमांचा विश्वासघात झाला आहे.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *