Breaking News

प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान, डिक्लेरेशनमध्ये लिहिलेल्या बायकोला पंतप्रधान….

लोकसभा निवडणुका लागणार आहेत, मोदींनी घोषणा केली आहे की, ४०० पार जागा निवडून आणणार आहोत. लोकांनी ठरवलं पाहिजे की, या ४०० पैकी ४८ जागा या महाराष्ट्रात आहेत. ४०० मधून ४८ गेले की ३५२ राहतात. त्यामुळे ४८ जागा कमी करणे ही आपली जबाबदारी आहे. त्या ४८ जागा आपण कमी करूया असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. मुंबई मुलुंड येथील लोकशाही गौरव महासभेत ते बोलत होते.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, मोदी कितीही वल्गना करत असले की, मी ४०० जागा जिंकणार आहे. पण आतली गोष्ट सांगतो की, ते पूर्णपणे कोसळले आहेत, तो माणूस घाबरलेला आहे. जुनागड येथील बंदरात १९ हजार कोटींचा नार्कोटीक्सचा ड्रग्स साठा सापडला. ज्याचा मालक अफगाण दाखवला की, जो फाटका आहे. आपली सत्ता गेली आणि चौकशी झाली तर आपण चौकशी केली नाही म्हणून जेलमध्ये जाऊ शकतो या भीतीने ते लटलट कापायला लागले असल्याचा गंभीर आरोपही यावेळी केला.

भाजपावर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा झेंडा दिसतोय का? तर दिसत नाही, नाव दिसत नाही. सब कूछ मोदी के नाम अशी अवस्था या ठिकाणी आहे. म्हणून, बातम्या सुद्धा मोदीच्या नावाने आहेत, अधूनमधून राहुल गांधींना दाखवलं जातं आणि विचारलं जातं की, हा बरा की हा बरा उपरोधिक टीका केली.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसवाल्यांना माझं सांगणं आहे की, मोदीला हरवायचे असेल, तर राहुल गांधींना पुढं करू नका, तर प्रियंकाला पुढे करा ती बरोबर त्याचे ४-५ वाजवत असते असा सल्लाही देत हे सरकार लुटारुंच्या मागे जात नाही, तर फक्त दिखावा करत आहे. मार्केटिंग करण्याच्या पलीकडे यांनी काहीच केले नसल्याची खोचक टीकाही केली.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, रिंगमास्टरला जसे पाहिजे तसे राजकारण तो करणार, या रिंगमास्टरला वाटलं की, एकत्र हे राहिले तर आपल्याला मदत आहे, तर तसे होऊ शकते, त्याला वाटले की, हे वेगळे असले पाहिजेत तर तसेही होऊ शकते. उद्याच्या कालावधीत युती होईल किंवा नाही होईल हे डोक्यातून काढून टाका, युती झाली तर फार चांगलं आहे आणि नाही झाली, तर आपल्याला लढायचे आहे असेही निर्धारपूर्वक सांगितले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जेवढ्या ताकदीने आपण उतरू, तेवढ्याच ताकदीने इतर पक्ष आणि समूह जो भाजपाच्या विरोधात आहे तो आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. विचारांची लढाई आपण उभी करतोय. आपण बघत असाल की, मोदी घराणेशाही काढत आहे आणि म्हणतात की, देशातील जनता हाच माझा परिवार आहे, मोदीना म्हणतोय की, हे तुझं म्हणणं खरं असेल, तर एक गोष्ट करून दाखव ते म्हणजे निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात जे डिक्लेरेशन दिले आहे की, माझं लग्न झालेलं आहे तेव्हा त्या महिलेला एक दिवस तरी पंतप्रधानाच्या घरात ठेव, मग आम्ही म्हणू की, तू या १४० कोटी लोकांचा बाप आहे अशी उपरोधिक टीका केली.

शेवटी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसवाल्यांना माझं सांगणं आहे की, मोदीला हरवायचे असेल, तर राहुल गांधींना पुढं करू नका, तर प्रियंकाला पुढे करा ती बरोबर त्याचे ४-५ वाजवत असते असा सल्लाही देत हे सरकार लुटारुंच्या मागे जात नाही, तर फक्त दिखावा करत आहे. मार्केटिंग करण्याच्या पलीकडे यांनी काहीच केले नसल्याची खोचक टीकाही केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *