Breaking News

राजकारण

सूरतमधील भाजपा उमेदवार मुकेश दलाल मतदाना आधीच बिनविरोध

सूरत मधील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचे मुकेश दलाल सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले. ७ मे रोजी सूरत लोकसभा मतदारसंघात मतदान होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील एका सभेत काँग्रेसला सत्तेवर आल्यास देशाची संपत्ती “घुसखोर” आणि “ज्यांना जास्त मुले आहेत” यांच्यात वाटली जाईल, या …

Read More »

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण निर्णय धर्मनिरपेक्ष विचारापासून अजिबात ढळलेला नाही हे सिद्ध होते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी टिकाकारांना प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा आज मुंबईत एमसीए लॉन्ज येथे राष्ट्रवादी …

Read More »

काँग्रेसचे प्रत्युत्तर, डॉ मनमोहन सिंह यांच्याबद्दल नरेंद्र मोदींनी केलेले विधान असत्य …

देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे आहे असे डॉ. मनमोहन सिंह यांनी कधीच म्हटलेले नाही. डॉ. सिंह यांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान असत्य आहे. डॉ. सिंह यांच्या विधानातील एक वाक्य घेऊन नरेंद्र मोदी चुकीची माहिती पसरवत आहेत. मुस्लीम समाजाविरोधात देशातील जनतेमध्ये असंतोष निर्माण करुन आपली राजकीय …

Read More »

राजस्थानात नरेंद्र मोदींचे हेट स्पीच; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे १७ तक्रारी मुस्लिम देशातील घुसखोर, हिंदूची मालमत्तेचे पुन्हा वाटप करण्याचा प्रयत्न

देशातील लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार चांगलाच शिगेला पोहोचत आहे. यापूर्वी केंद्रिय निवडणूक आयोगाने लेव्हल प्लेइंग फिल्डचा घोषणा करत काँग्रेस आणि त्यांच्या प्रचारावर बारकाईने लक्ष्य ठेवण्यास सुरुवात केली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील बनसाडा येथील प्रचार सभेत बोलताना काँग्रेसवर त्यांच्या मुस्लिमांविषयीच्या धोरणावर टीका करत प्रचारासभेत मुस्लिम विरोधी वक्तव्य केले. …

Read More »

मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ११ बुथवर पुन्हा मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे आयोगाला पत्र

भारताच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी अंतर्गत मणिपूरमधील पाच विधानसभा क्षेत्रांमधील ११ बूथवर घेतलेले मतदान रद्द घोषित केले आहे, पीठासीन अधिकाऱ्यांनी काही बूथमध्ये जमावाने हिंसाचार, गोळीबार आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे नष्ट केल्याचा अहवाल दिला आहे. ईसीआयने जाहीर केले आहे की या बूथवर सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत फेरमतदान घेण्यात येईल. …

Read More »

शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगरचे लोकसभेचे उमेदवार संदिपान भुमरे

मागील काही महिन्यापासून शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगरमधील संभावित उमेदवार कोण अशी चर्चा सातत्याने होत होती. अखेर शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगर अर्थात पूर्वीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान फलोत्पादन आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे संदिपान भुमरे यांची थेट लढत शिवसेना उबाठा गटाचे खासदार चंद्रकांत खैरे आणि …

Read More »

“आदित्य ठाकरे मुख्यमंत्री” उद्धव ठाकरे -देवेंद्र फडणवीस आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीत

महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणूका जाहिर होऊन पहिल्या टप्प्यातील मतदानही पार पडले. या मतदानानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील जवळपास १३ मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज दिलेल्या एका मुलाखतीत नवीनच मुद्दा पुढे आला. त्यातच भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे …

Read More »

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस असल्याचे स्पष्ट करणारे ठरले आहे. जनता भाजपाच्या जुमलेबाजीला बळी पडली नाही, १० वर्षांच्या अन्याय काळ ला जनतेने मतपेटीतून उत्तर दिलेले आहे. भाजपा दक्षिण व मध्य भारतात साफ तर उत्तर व पूर्व भारतात हाफ झाली असून …

Read More »

नरेंद्र मोदी यांचा आरोप, साहेबजादे हारतील… परदेशातील शक्तींशी हात मिळवणी

२० एप्रिल रोजी राजकीय पक्षांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दुस-या टप्प्यासाठी त्यांच्याच पक्षाला मतदारांनी मतदान करावे यासाठी प्रचाराची जोरात सुरुवात केली. कर्नाटकातील चिक्कबल्लारपुरा येथील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकेची झोड उठवित म्हणाले की, भारतातील आणि परदेशातील मोठ्या आणि शक्तिशाली लोकांनी त्यांना सत्तेवरून दूर करण्यासाठी …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, लोकशाहीसाठी ही निवडणूक महत्त्वाची

सध्या देशाची वाटचाल हुकुमशाही कडे चालू आहे. ही हुकूमशाही आपली लोकशाही उद्धवस्त करेल, त्याला उत्तर द्यावं लागेल. ही निवडणूक लोकशाही टिकवण्याकरिता महत्त्वाची आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिला. महाविकास आघाडीकडून जालना लोकसभेसाठी डॉ. कल्याण काळे आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांना …

Read More »